- जिल्हाधिकार्यांसहित अन्य मान्यवरांना लिहिलेल्या पत्राचे "उत्तरे" कोण देणार?
- वन अकादमीमध्ये सोयींचा अभाव असल्याचा आरोप !
चंद्रपूर : रविवार दि. २0 सप्टेबरपासून समाज माध्यमावर चंद्रपूर येथील वन अँकेडमी कुटुंबासहित उपचारार्थ असलेल्या एका महिलेने तिची व्यथा तक्रारीच्या स्वरूपात चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांचे सोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री नाम. विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रातील कॉग्रेसचे एकमेव चंद्रपूरचे खासदार बाळु भाऊ धानोरकर, अपक्ष म्हणून निवडून आलेले रेकार्ड मते घेणारे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व दखल न्यूज भारत पोर्टल चैनल नागपुर चे कार्यकारी संपादक, सुनील साळवे यांचे नांवे सोशल माध्यमांवर फिरत आहे, या महिलेला तिच्यासोबत तिच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय हवा. चंद्रपूर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांना एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे अमानुष वागणूक दिली जाते, समाजापासून दूर ठेवल्या जाते यासाठी विलगीकरण केंद्रात आणून सोडले जाते. परंतु त्या ठिकाणी ठेवणार्यांचाही जीव आहे. याचा विसर येथील प्रशासन, आरोग्य विभाग व त्या ठिकाणच्या कर्मचार्यांना पडला आहे असे नमूद करित या बाधित त्रस्त महिलेने हे पत्र सोशल माध्यमांवर शर्मा मिळावा व अन्य बाधितांना अशी वागणूक मिळू नये या आशेने हे पत्र माध्यमांवर टाकले आहे.
त्या पत्रावर निष्पक्ष चौकशी होऊन व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी व अन्य कुणालाही अशी वागणुक मिळू नये यासाठी त्या पत्राचा संपादित अंश...
प्रति,
मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा
विषय :- कोरोना रुग्णास होणाऱ्या गैरसोयीबद्दल !
मी *******कोरोना रुग्ण, covid care सेंटर फ़ॉरेस्ट अकॅडमि, mul रोड, चंद्रपूर, बिल्डिंग no.3 येथे दिनांक 9/9/20 ला संपूर्ण कुटुंबासोबत (कोरोना पॉझिटीव्ह) दाखल झाली होती ,15/9/20 ला सुट्टी देण्यात आली परंतु तेथील दिल्या जाणाऱ्या गैरसोईने आज माझे इन्फेकशन lungs पर्यंत पोहचले, तरी होत असलेल्या गैरसोयीबद्दल तुम्ही हस्तक्षेप करून व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा...! आणि नंतर येणाऱ्या रुग्णाला या गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी एक काळजीवाहू नागरिक म्हणून प्रयत्न... !
मला त्रास होत असलेल्या आणि निदर्शनात आलेल्या मुख्य बाबी आपणास मुद्देसूद नोंद करून देते
1) मला 7 तारखेपासून 100 above temperature होते टेस्ट करून कोरोना पॉसिटीव्ह निघाली. admit झाल्यानंतर तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली पण त्यांनी मला फक्त paracitimol दिल्या. Antibiotic देण्याची आम्हाला परवानगी नाही आणि कोरोनावार औषध नाही अशे सांगण्यात आले.
-पण जर तुमच्या शरीरात continu ताप असेल तर without मेडिसिन कस चालेल, काहीतरी योग्य antibiotics द्यायला हव्यात.
-आणि जर मेडिसिन नाहीत तर private डॉक्टर रुग्णांवर उपचार करून कोरोना रुग्ण बरे कशे होतात.
-जर औषध उपचार नसेल भेटत तर तिथे admit फक्त समाजाचा विचार करून isolate करणं आणि रुग्णांचाही जीव आहे हा विचार नं करणं हे कस योग्य आहे,
2) तिथे गरजेची वस्तू साधं BP operator उपलब्ध नाही, सासऱ्यांची हालत एवढी खराब असताना ते चेक करता नाही यावं..
3) 12/9/20 ला रात्री 2: 30 वाजता सासरे अचेतना अवस्थेत पोहचले.. खूप आवाज देऊन, डॉक्टर area मध्ये एकही सिस्टर किंवा कुणाचाही प्रतिसाद आला नाही. मुळात ते तिथे उपस्थित न्हवते.
4) इन्सुलिन patients चांगली व्यवस्था मिळावी म्हणून तिथे आणल्या गेलं पण ते इन्सुलिन ठेवायला त्याला साधा फ्रीज नाही.. चहाच्या कप मध्ये कॉटन मध्ये गुंडाळून ते ठेवत होते, इन्सुलिन quality कशी चांगली राहील.किती तडफडताना त्यांना मी बघत होती.
5) आम्ही तिथे गेल्यानंतर emergency मध्ये मला एका रूम मध्ये ठेवण्यात आलं. आणि नंतर दुसरी रूम मागितली तर तेथील जुन्या रुग्णांनी घाण केलेलं अतिशय अस्वच्छ toilet, bathroom , besin, pasage, मला स्वतःला स्वच्छ करायला लावला, तुम्ही राहणार आणि आम्ही साफ करून देऊ का असं उत्तर देण्यात आलं. मुळात शिफ्ट होण्याआधी ते अगदी sanitized आणि स्वच्छ करून देण गरजेचे आहे. नंतर ते ज्याचं त्यांनी स्वच्छ करायला हरकत नाही.
ते स्वच्छ करायला ब्रश आणि पावडर पण पुरविल्या गेला नाही. मला खराट्याला प्लास्टिक गुंडाळून अंगात ताप असताना स्वच्छ करावं लागलं.
6) तेथे येणाऱ्या काही रुग्णांना(साबण, ब्रश, ऑइल ) ही किट दिली गेली नाही. मागितल्या नंतरही ती मुळात available असताना.
7) माझ्या 1 वर्षाच्या मुलाला जेवणाची व्यवस्था केली गेली नाही. रोज त्यांना बोलूनही तिखट वरण आणि भाजी देण्यात आली. अक्षरशः त्याला पाण्यात भिजवून पोळी चारण्याची वेळ माझ्यावर आली.
8) बोलल्यानंतर मुलाला दुध देण्यात आले परंतु अतिशय फेसाळलेलं, 20 टक्के दूध आणि 80 टक्के पाणी असे दूध पुरविण्यात आले. तेही अस्वछ बॉटल मध्ये जीला बाहेरून पूर्ण माती लागलेली असायची.
9) जेवणाचा दर्जा ही पाहिजे तसा चांगला नाही पोळ्या निकृष्ट दर्जाच्या,नाश्ता दिलेली मोट कच्ची. भात अपूर्ण शिजलेला. आणि तक्रार केल्यानंतरही, कर्मचाऱ्याकडून उलट उत्तरे देण्यात आली की हे तुमचं घर नाही. इथे आले कशाला वैगरे.
10) Admit झालेल्या पेशन्ट ला fourth class कर्मचाऱ्याकडून अपमानित वागणूक दिल्या जातेय जशे ते खूप मोठे गुन्हेगार आहेत. उद्धट बोलल्या जात आणि मानसिक खच्चीकरण केल्या जात. जरी रुग्ण स्वतःच्या आयुष्यात उच्च दर्जाचे अधिकारी असतील तरी. वैधकीय सेवेतील officer रुग्ण यांच्या अशा वागणुकीमुळे अक्षरशः रडताना बघितलं.
11) तेथील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी ग्रुप करून gate वर बसून without मास्क गोष्टी करत खर्रा खात बसतात आणि पेशन्टला खिडक्या बंद करायला सांगतात वारंवार. इन्फेकशन बाहेर जावं नाही म्हणून. खिडक्या बंद करणं योग्य पण श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि आणखी काही अडचणी असतील तर त्या उघडाव्या लागतीलच
12) बाथरूम च्या खिडक्यांच्या काचा निघालेल्या माझ्या husband ला repair कराव्या लागल्या .
13) रात्री multivitamin ani sakalala vitamin c asha tablet det असताना 14 तारखेला sakalipn multivitamin देण्यात आले . विचारल्या नंतर व्हिटॅमिन C चा स्टॉक नाही हे सांगण्यात आलं. बरेचदा व्हिटॅमिन C च्या गोळ्यांचा poweder झालेला दिसला. छोट्या मुलाला कुठल्याच suplement medicine देण्यात आलं नाही.
14) घरी home isolation घेण्याचा प्रयत्न केलं पण सासर्यांचे वय जास्त आणि मुलं 5 वर्षाच्या आतील असल्याने. रिस्क फॅक्टर सांगून आणि नियम दाखवून इन्स्टिट्यूशनल quarntine करण्यात आलं. पण मुळात तिथेच या गैरसोईमुळे वीणा औषध उपचाराने आज रिस्क मध्ये गेलो.
करिता आपणास विनंती आहे की गोष्टीचे गांभीर्य घेऊन लक्ष घालावे.
या आशयाचे पत्र सोशल माध्यमांवर फिरत आहे. बाधितांनी अनुभवलेले कथन या ठिकाणी त्यांनी आपल्या शब्दांमध्ये व्यक्त केले आहेत. त्यांच्या नंतरच्या कोणत्याही बाधितांना या समस्येचा सामना करायला नको या उद्देशानीचं त्यांनी हे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून संबंधित मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांच्या नावे लिहीले आहे. ही समस्या एकमेव आपले मत व्यक्त करणाऱ्या या निर्भीड महिलेची नाही तर अनेक बाधित कुटुंबाची आहे. जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांनी स्वतः याकडे जातीने लक्ष घालून याची चौकशी करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या