गडचांदूरच्या "त्या" स्विपर चे कार्यमुक्तचे पत्र आणि नंतर चे राजकारण...?



  • गडचांदूर ग्रामीण रूग्णालयातील P.M. करण्यासाठी स्विपर स्मितेश लोखंडे चे लाच प्रकरण !

  • विदर्भ आठवडी च्या बातमीचा impact !

  • मृतकांच्या नातेवाईकांकडून लिहून घेतले, आम्हीचं दिले पैसे, आणि 1500 रू. केले परत - घृणास्पद बाब !
गडचांदूर : गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात 12 सप्टेंबर रोजी श्रीकांत बोबडे या मृतकाच्या पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालयाचे स्वीपर स्मितेश लोखंडे यांनी अडीच हजार रुपये ची लाच घेतल्याची बातमी विदर्भ आठवडी प्रकाशित केली होती. यासंदर्भात विदर्भ आठवडीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, त्यावेळी उपस्थित असलेले डॉ. महेश हिरादेवे व लाच घेणारा स्वीपर स्मितेश लोखंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यावेळी डॉ. गेडाम यांनी स्वीपरवर कडक कारवाई करण्यात येणार असे सांगितले होते. यासंदर्भात डॉ. गेडाम यांनी विदर्भ आठवडीच्या वृत्ताचा दावाला देत चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सकांना स्विपर लोखंडे यांना कार्यमुक्त करण्यात यावे, असे पत्र ही सादर केले. परंतु आम्हाला मिळालेल्या वृत्तानुसार बुधवार दि. 16 सप्टेंबर रोजी मृतकांच्या नातेवाईकांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात बोलवून त्यांना आम्ही स्वतःहून पैसे दिले, त्यासाठी आमच्यावर बंधन आणले नव्हते. असं लेखी लिहून 1500 रुपये परतही करण्यात आले, चोरांच्या पाठीमागे राहण्याची ही गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी यांची भुमिका अत्यंत घृणास्पद आहे. "चोर चोर मौसेरे भाई"अशी परिस्थिती गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दिसत आहे.


सविस्तर वृत्त असे की, गडचांदुरजवळील हिरे बोरगाव या ठिकाणचे श्रीकांत शामराव बोबडे यांचा बुधवार दि. 10 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. मृतांचे शव गडचांदूर च्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी हलविण्यात आले. मृतकाच्या नातेवाईकांकडून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातील स्वीपर सुमित लोखंडे यांनी पोस्टमार्टेमसाठी अडीच हजार रुपये उकळले, गडचांदुरातील काही समाजसेवकांनी या प्रकारावर अआक्षेप घेतला व ही बातमी मीडिया पर्यंत पोहोचली. त्यावेळी गडचांदुर ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेले डॉ. महेश हिरादेवे यांची ही video clip समाजसेवकांनी घेतली. अत्यंत बोलक्या असलेल्या या व्हिडिओमध्ये डॉ. हिरादेवे या प्रकरणाविषयी अत्यंत सूचक विधान करीत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर विदर्भात आठवडी च्या टीमने डॉ. हिरादेवे, डॉ. गेडाम यांचेशी संपर्क साधून सदर प्रकरणाची वाच्यता केली व वृत्ताच्या माध्यमातून ते प्रकाशित ही केले. तत्पूर्वी लाच घेणारा स्वीपर लोखंडे यांनी भ्रमणध्वनीवर आपण अडीच हजार रुपये घेतल्याचे कबूलही केले व ही रक्कम चार लोकांमध्ये वाटली जाते अशी स्पष्ट कबुली या भ्रमणध्वनीवर त्यांनी केली होती. याच संदर्भात गडचांदुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या स्विपरवर कडक कारवाई करण्यात येईल, असे विदर्भ आठवडी च्या प्रतिनिधीला सांगितले होते. स्विपर लोखंडे यांना कार्यमुक्त करण्यात यावे, असे पत्र चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सकांना गडचांदूर चे वैद्यकीय अधिक्षक यांचेकडून सादर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि. 16 सप्टेंबर रोजी कागदोपत्री खेळी गडचांदुर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्या व मृतकाच्या कुटुंबांना घरी मृत झाल्यानंतरही बोलवून त्यांचेकडून कागदावर लिहून घेण्यात आले, हा प्रकार वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. गडचांदुर ग्रामीण रुग्णालय समस्यांनी घेरलेले आहे. डॉ. गेडाम यांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही, डॉ. हिरादेवे यांच्या अनेक तक्रारी गडचांदूर मध्ये आहे. डॉ. गेडाम यांनी भ्रमणध्वनी वर बोलतांना कोणतीही रक्कम ग्रामीण रुग्णालयात देण्यात येऊ नये अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत बोलावे असेच सांगितले होते परंतु डॉक्टर हिरादेवे यांनीसुद्धा आमचा दहा वेळा फोन केल्यानंतर एकदा उचलला. वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. गेडाम त्याठिकाणी उपस्थित राहत नाही. ही गडचांदुरवासियांची तक्रार आहे. विवाह नोंदणी पासून तर 108 रूग्णवाहिका बुकिंग करण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात, पैश्याशिवाय कोणतेच काम होत नाही, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात गडचांदूर च्या समाजसेवकांनी सदर प्रतिनिधीला दिली आहे.

पोस्टमार्टेम संदर्भातील प्रत्येक ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांना विदर्भ आठवडी कडून पाठविण्यात आले आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सेवा देणारे व मृतांमध्ये प्राण फुंकणारे अशी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची प्रतिमा आहे, ती आता धुळीस मिळत आहे. यावर वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीतांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

गडचांदूर मध्ये घडलेल्या प्रकरणात दोषीला पाठीशी घालण्याचा प्रकार घडत आहे. गडचांदूरमध्ये एक प्रकरण उघडकीस आले, असे कितीतरी प्रकरण दाबल्या गेले असतील. त्याबाबतही विचार व्हायला हवा व ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच डॉ. हिरादेवे, डॉ. गेडाम यांच्या संपूर्ण तक्रारीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गडचांदूर च्या समाजसेवकांनी प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या