- भिम आर्मी चे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांची तहसिलदारांना तक्रार !
मौजा गडचांदूर नगर परिषद हद्दीत शासन निर्बंध झुगारून गुंठेवारी पद्धतीने सर्व्हे नं. १२८/१/अ शेतजमिन विकुन जनतेची फसवणुक करणाऱ्या कोरपना तालुक्यातील थुटरा येथील शेतमालक वेंगय्या गुर्रम यांचेवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा करा अशी तक्रार नुकतेच भिम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी कोरपना चे तहसिलदारांना दिले असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ही बोरकर यांनी पत्रान्वये दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर नगर परिषद हद्दीतील वेंगय्या गुर्रम या शेतमालकाने आपले १० एकर शेत कोणतीही परवानगी न घेता कोणासही पूर्वसूचना न देता १००/- रूपयांचे स्टॅम्प पेपर वर साधे विक्रीपत्राचे आधारे लाखो रूपयांचा व्यवहार करून विक्री केली असुन दोन ते तिन लाख रूपये प्रति गुंठा याप्रमाणे शेकडो प्लॉट ही विकलेले असल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. यात शासनाचे लाखो रूपयांचे राजस्व बुडाले असल्याची बाब ही त्यांनी या तक्रारीत नमूद केली आहे. विशेष म्हणजे या शेतातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची हायटेंशन लाईन गेलेली असून गोर-गरिब प्लॉट धारकांचे जीव धोक्यात घालून त्याखालील प्लॉटची सुद्धा विक्री करण्यात आली असून या विद्युत वाहीनी ने परिसरात मोठी प्राणहानी होत असल्याची गंभीर बाब ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मौजा गडचांदूर नगर परिषद हद्दीतील शासन निबंध झुगारून गुंठेवारी पद्धतीने शेतजमीन विकणाऱ्या वेंगय्या गुर्रम या शेतमालकावर जनतेची फसवणुक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ही या पत्रान्वये भिम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी दिला आहे.
महत्वाचे म्हणजे ब्रम्हपूरी व राजुरा उपविभागात भू-माफियांनी गरीब व आदिवासी शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन गुंठेवारी नुसार अनेक शेतजमिनी फस्त केल्यात. त्यावेळेस पासून मान. उच्च न्यायालय नागपूर यांनी महाराष्ट्र शासनाचे गुंठेवारी जमिन विक्री वर बंदी घातलेली असतांना ही गडचांदूर व आजुबाजुच्या परिसरात १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर गरीब आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचा गोरखधंदा सुरू आहे, यात अनेकांनी मोठी माया जमविली आहे.
0 टिप्पण्या