- तलवारी सहित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !
चंद्रपूर : आज शनिवार दिनांक 26 डिसेंबर २०२० रोजी ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवी, राजकीय पुढारी किशोर पोतनवार (वय 76) यांचेवर दादमहाल वार्ड येथील त्यांच्या राहत्या घरी वार्डातीलचं एका गावगुंडाणे ते स्वत:च्या घरासमोर वृत्तपत्र वाचित असतांन तलवारीने हमला केला. यावेळी त्यांच्यावर चार वार करण्यात आले, परंतु हातामध्ये काठी असल्यामुळे आणि वार करणारा गुंड हा पिऊन असल्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, यासंदर्भात आज शहर पोलीस स्टेशन मध्ये शहर पो. स्टे. चे इंचार्ज यांना सरळ भेटून तक्रार करण्यात आली, शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. विभागाच्या टीमने आरोपी विलास नागुलवार याला हत्यारा सहीत ताब्यात घेतले, आरोपी विलास नागुलवार हा दारूच्या नशेमध्ये होता, त्याच अवस्थेत शस्त्रासह त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात कोणता गुन्हा दाखल केला हे वृत्त लिहिस्तोवर कळू शकले नाही. एखाद्या ज्येष्ठ पत्रकारावर या पद्धतीचा प्राणघातक हल्ला होत असेल तर ही बाब कायदा व सुव्यवस्थेला हानिकारक आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार दिनांक 25 डिसेंबर रोजी किशोर पोतनवार हे दादमहाल वार्ड येथील आपल्या राहत्या घरासमोर खुर्ची टाकून पेपर वाचत असताना शेजारीच राहणारा विलास नागुलवार हा दारूचे नशेमध्ये तलवार घेऊन फिरत होता. आणि अर्वाच्य शब्दांमध्ये शिवीगाळ करत होता, त्यावेळी बाहेर वृत्तपत्र वाचत बसलेले किशोर पोतनवार यांनी त्याला टोकले असतात तलवार घेऊन तो त्यांच्या अंगावर अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करत धावून आला त्यावेळी किशोर पोतनवार यांच्या हातामध्ये लाठी होती त्यांनी त्याचा प्रतिकार केला, दारूच्या नशेमध्ये खुल्या तलवारीने चार वार त्यांनी पोतनवारांवक्ष केले परंतु हाती दंड असल्यामुळे एकही तलवारीचा वार त्यांना झाला नाही. गावगुंड असलेला विलास नागुलवार याच्यावर अनेक गुन्हे शहर पोलीस स्टेशन जिल्ह्यामध्ये दाखल आहेत. चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये विलास नागुलवार अडकला आहे, घरच्यांना मारझोड करणे, गावांमध्ये दहशत पसरविणे, हा छंद आहे. आज त्यांनी ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला सुदैवाने त्यातून किशोर पोतणवार हे बचावले. शहर पोलिसांनी गावगुंड असलेल्या विलास नागुलवार याला हत्यारासहित ताब्यात घेतले. त्या वेळीही तो दारू ढोकसूनचं होता. शहर पोलिसांनी गुंडांवर प्रतिबंधात्मक मूक कडक कारवाई करायला हवी. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये जर पत्रकारांवर बिनधास्तपणे हमला करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही तर पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निदर्शने केल्या जातील, त्यांना काळे झेंडे दाखवले जातील, व त्यांच्या दौऱ्यानिमित्त विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघटना संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठे आंदोलन उभारले याची दखल जिल्हा पोलिसांनी अवश्य घ्यावी. किशोर पोतनवार हे नाव जिल्ह्यामध्ये अनोळखी नाही. ज्येष्ठ पत्रकार, निर्भीड राजकारणी अशा अनेक उपाध्या किशोर पोतनवार यांच्या नावासमोर लावल्या जातात. जिल्ह्यामध्ये आज सुरू असलेले गैरप्रकार, हे सर्व परिचित आहे. पोलीस विभागाचा अशा गैरप्रकारावर दबाव नाही, जिल्ह्यामध्ये या गैरप्रकारांवर आळा बसावा याची जबाबदारी असलेला, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पोलीस विभाग हा आज जिल्ह्यामध्ये गैरप्रकारांना थारा घालीत आहे हे कुठेही लपले नाही. येणाऱ्या दोन दिवसात बीड जिल्हा पोलिस विभागाने अशा गैर प्रकारांवर आळा घातला नाही तर पोलीस महानिरीक्षक यांच्या दौऱ्यामध्ये पत्रकार संघटनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारले जाईल.
0 टिप्पण्या