- "आमचे सुरू तिथपावेतो तुमचे सुरू" हे ब्रिद !
- तिन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या स्वयंभू नेत्यांचे उपद्रव!
- पोलिस अधिक्षकांनी स्वत: लक्ष घालण्याची गरज !
गडचांदूर च्या "त्या" क्लब मालकाची कथा !
तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपद्रवी बिनकामी स्वयंभू पुढारी हा जुगाराचा व्यवसाय चालवित आहे. महत्वाचे म्हणजे स्वतःला राजकीय पक्षाचे नेते म्हणविणाऱ्या या उपद्रव्यांवर यापूर्वी गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून या तीनही क्लब मालकांचे विविध अवैध व्यवसाय गडचांदूर शहरामध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील पहिल्यापाशी ज्या पक्षाचे पद आहे, त्यांशी त्याचा दूरदूरचा संबंध नाही, त्याचा खानदानी भंगार चा व्यवसाय आहे आणि हाच यातील मुख्य आहे. दूसरा मागील अनेक वर्षांपासून सट्ट्याच्या व्यवसायात कार्यरत आहे, ज्या पक्षाशी हा संबंधित आहे, त्या पक्षाचे"एबीसी" ही याला समजत नाही. तर तिसरा स्वत:ला जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगत आहे, यापूर्वी याचा शहरात दारूचा व्यवसाय होता. महत्त्वाचे म्हणजे तिघांनाही लिहीता-वाचता येत नाही, फक्त बॅनरवर लागणारे फोटो पाहून समाधान अशी यांची स्थिती आहे. विशेष बाब म्हणजे हे तिन ही इब्लिस नमुने वेगवेगळ्या पक्षात पदांवर कार्यरत आहेत. यालाचं म्हणतात "अडाण्याचे ******, नियमांचा ***** उदास"!
चंद्रपूर : नुकतेच गडचांदूर येथील स्वतःला राजकीय पक्षाचे नेते म्हणवून घेणाऱ्या तिन स्वयंभू उपद्रवी नेत्यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या जुगाराबद्दल "विदर्भ आठवडी" च्या न्युज पोर्टल ने "गडचांदुरात बिनकामी राजकीय लोकांचा "जुगारा"चा क्लब, लाखोंची उलाढाल !" या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर हा जुगार चालविणाऱ्या महाभागांनी काही स्थानिक अधिकाऱ्यांना (?) "आमचे सुरू तिथपावेतो तुमचे सुरू" हे ब्रीद ऐकविले. या ब्रिदाचा नेमका अर्थ काय? याची शहानिशा केली असता जोपावेतो आमची कमाई सुरू तोपावेतो तुमची "बिदागी" तुम्हाला मिळेल, हा त्यामागील अर्थ असल्याचे सांगण्यात आले आणि हा जुगार क्लब पूर्ववत "जैसे थे" सुरू आहे. तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपद्रवी बिनकामी स्वयंभू पुढारी हा व्यवसाय चालवित आहे. गडचांदूरात कोरपना रोडवरील पूर्वाश्रमीच्या एका बार मध्ये या जुगाऱ्यांची जेवणाची व त्यासोबतचं मद्याची व अन्य नशेली पदार्थांचा पूरवठा जुगार क्लब मालकांकडून या जुवाऱ्यांसाठी केला जातो. त्याच परिसरात एका इमारतीमध्ये हा जुगार क्लब दिवस-रात्र सुरू असतो. गडचांदूरातील काही स्थानिक भ्रष्ट पोलिस या कामात त्यांचे सहभागी आहेत, सोबतचं "बांधण्यात" आलेली रक्कम ही या क्लब मालकांकडून पोलिस स्टेशनपर्यंत पोचती केली जाते, त्यामुळेच खुलेआम हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू आहे. गडचांदूर शहरातील कोरपना रोडवर सुरू असलेल्या या जुगार क्लब मध्ये रोजची लाखो रूपयांची उलाढाल होत असते. परराज्यातून व परजिल्ह्यातील जुगार प्रेमी या जुगार अड्यावर येत असतात व याठिकाणी मुक्कामी असतात, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या पिण्या-खाण्याची व्यवस्था अल्पसा शुल्क आकारून क्लब चालविणारे हे गडचांदूर मध्येचं करतात. परराज्यातून, परजिल्ह्यातून येणारे हे शौकीन शहरासाठी नाहीतर जिल्ह्यासाठी धोकादायक आहेत. या गैरप्रकारातून येणाऱ्या काळात काही दूर्घटना घडल्यास त्यास जबाबदार गडचांदूर पोलीस राहील याचा विसर मिळणार्या "बिदागी" मुळे गडचांदूर पोलिसांना पडला असल्याचे दिसते.
महत्वाचे म्हणजे स्वतःला राजकीय पक्षाचे नेते म्हणविणाऱ्या या उपद्रव्यांवर यापूर्वीच गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून या तीनही क्लब मालकांचे विविध अवैध व्यवसाय गडचांदूर शहरामध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या गैरप्रकाराकडे आवर्जून लक्ष घालावे, अशी मागणी या वृत्ताच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या