- चंद्रपूरच्या प्रशासनाला उच्च न्यायालयात विचारणा....!
१३ जानेवारीपर्यंत दिला अवधी !
नागपूर : आंतराष्ट्रीय कोरोना महासाथीची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे काय उपाययोजना करणार आहात, अशी स्पष्ट विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाला केली. यासंदर्भात न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांनी येत्या १३ जानेवारीपर्यंत अवधी दिला आहे.कोरोना रूग्णांच्या समस्येप्रकरणी उत्तर दाखल न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना नोटीस बजावून सोमवार २१ डिसेंबरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. माजी खासदार नरेश पुगलिया व इतर नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, त्यासंदर्भातील सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दुसऱ्या कोरोना लाटेबद्दल प्रश्न उपस्थित करीत १३ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
दरम्यान, कोरोना रूग्णांच्या समस्येप्रकरणी उत्तर न दाखल केल्यामुळे न्यायालयाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना नोटीस बजावून सोमवारी २१ डिसेंबरला सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. दोन्ही अधिकारी सोमवारी हजर झाले. चंद्रपूर जिल्हयात कोरोना प्रतिबंधाकरिता काय केले, अशी विचारणाही न्यायालयाने केली. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपल्या योजना सादर कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. चंद्रपुरात जीवनावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पुरेशा संख्येत खाटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे माजी खासदार नरेश पुगलिया व इतर नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अँड. श्रीरंग भांडारकर , केंद्र सरकारतर्फे अँड. उल्हास औरंगाबादकर, मुख्य सरकारी वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडली.
0 टिप्पण्या