- विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघाची मागणी !
- ग्रामीण भागातील आठवडी बाजार व चिल्लर विक्रेत्यांच्या वजन काट्यांची तपासणीचं होत नसल्याची तक्रार !
ग्रामीण भागात निर्धारित दरांपेक्षा जास्त आकारणी !
यासंबंधात ग्रामीण भागामधील काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला असता कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांनी काही महिन्यापूर्वी तपासणी करून प्रमाणपत्र दिली आहे परंतु या संदर्भात शासनाने निर्धारित केलेले दर व निर्देश यांची पायमल्ली कंत्राटदाराकडून करण्यात आली असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कबुली दिली. वजन काटे तपासण्याचे दर हे जवळपास दोनशे रुपये आहेत, कंत्राटदार या संबंधात दरवर्षी एक हजार रुपये प्रत्येक व्यापाऱ्याकडून घेतात, परंतु यावर्षी १२००/- रुपये कंत्राटदाराकडून घेण्यात आले. व्यापारी वर्ग मुकाट्याने ही रक्कम देत असतो, "पाणी में रहके मगरमच्छ से बैर !" या म्हणीप्रमाणे मागील काही वर्षापासून हे मुकाट्याने सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळेस सांगितले.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील आठवडी बाजारात छोटे-छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन-काट्यांची तपासणी करण्यात यावी व त्यांचे वजन काटे सहाय्यक निबंधक वैधमापन शास्त्र यांचेकडून प्रमाणित करण्यात यावे अशी मागणी नुकतीच विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्यात व जिल्ह्यामध्ये अनेक मोठे व लहान व्यवसाय कार्यरत आहे. त्यांचेपाशी आधुनिक व जुन्या पद्धतीचे वजन काटे उपलब्ध असतात. या वजन काट्यांची ठरवून दिलेल्या अवधीमध्ये रितसर तपासणी करण्याची जबाबदारी ही सहाय्यक निबंधक वैधमापन शास्त्र विभागाकडे असते. ग्रामीण भागामध्ये वजन काटे तपासणी करण्याचे कंत्राट हे अधिकृत कंत्राटदाराला दिले जाते. तर शहरी भागात स्वतः या विभागाचे अधिकारी लक्ष केंद्रित करतात असे सांगण्यात येते. परंतु हाती आलेल्या सूत्रानुसार ग्रामीण भागांमध्ये आठवडी बाजारात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन-काट्यांची तपासणीच करण्यात येत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आठवडी बाजारात बसणारी चिल्लर व्यापारी, ग्रामीण भागात मास विक्री करणारे (मटन, मुर्ती, कोंबडी) व्यापारी यांच्या वजन काट्यांची तपासणी होतं नसल्याची लक्षात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागामधील भजन काट्या मधून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असते परंतु सहाय्यक निबंधक वैधमापन शास्त्र या विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, या विभागाने कंत्राटी तत्त्वावर दिलेले कंत्राटदार यांचे लक्ष फक्त मोठ्या व्यवसायाकडे व व्यापाऱ्यांकडे असते. जिल्ह्यातील व शहरातील अनेक भागांमध्ये मांस विक्री करणारे व आठवडी बाजारांमध्ये चिल्लर जिन्नस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वजन काट्याची मागील कितीतरी वर्षापासून तपासणी झाली नसल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघाने सहाय्यक निबंधक वैधमापन शास्त्र विभागाला अशी तपासणी करण्यात यावी या संबंधात निवेदन दिले आहे.
महत्वाचे म्हणजे सहाय्यक निबंधक वैधमापन शास्त्र या विभागावर मोठी जबाबदारी आहे. चिल्लर भाजीपाला विक्रेत्यापासून तर पेट्रोल पंप, धरम काटे सारख्या मोठ्या कारभाराचे वजन काटे तपासणीची जबाबदारी याच विभागाकडे आहे. हा विभाग अत्यंत जिर्ण इमारतीत कार्यरत असून "त्या" इमारतीत महत्त्वाची जबाबदारी निभावणे म्हणजे "विस्तवावर चालण्यासारखे" आहे. संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी, कामाचा व्याप मोठा, अपूरा कर्मचारी वर्ग अशा अनेक जबाबदाऱ्यांना या विभागाला सामोरे जावे लागत आहे, याकडे शासनाने, जिल्हा प्रशासनाने अवश्य लक्ष द्यायला हवे. आज वजन-काटे आधुनिक झाले आहेत परंतु या विभागाची इमारत अद्यापही जुन्याचं दगडी-काट्यासारखी आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या