चंद्रपूरात ‘बर्ड फ्ल्यु' च्या अफवा !



  • जिल्ह्यात चिकन-अंडी खाणे सुरक्षित !

  • पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राजपुत यांचे प्रतिपादन !

चंद्रपूर : चाचणी नंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 'बर्ड फ्ल्यु' चे पक्षी मिळाले, असे वृत्तपत्रांमध्ये आलेले वृत्त ही अफवा असून असे कोणतेही पक्षी अद्याप चंद्रपूर जिल्ह्यात मिळाले नसून येणारे वृत्त हे निराधार आहे. ७ तारखेला बल्लारपूर तालुक्यामधील मानोरा येथे ३ कावळे मृतावस्थेत आढळले, परंतु चाचणीनंतर त्यांचा अहवाल तसा आलेला नाही, त्यामुळे येणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राजपुत यांनी केले आहे.

आज विविध वृत्तपत्रांमध्ये चंद्रपूर सह अन्य भागामध्ये चाचणीमध्ये ‘बर्ड फ्ल्यु' चे पक्षी मिळाले असे वृत्त प्रकाशित झाले, त्यासंदर्भात चंद्रपूर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राजपुत यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता  जिल्ह्यामध्ये असा प्रकार आढळला नसून मान. मुख्यमंत्री व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या अआहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये २२ रेपिड पथके निर्माण करण्यात आली असून या पथकामध्ये १ पशुधन विकास अधिकारी, १ पशु अधिकारी व १ परिचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्म व वनविभागाला मृत पावलेल्या पक्ष्यांबद्दलची माहिती देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आत्तापावेतो अनैसर्गिकरित्या मृत पावलेले कोणतेही पक्षी जिल्ह्यात आढळले अफवा पसरवू नये, असे आवाहन राजपुत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये चिकन व अंडी यावर अद्यापपावेतो कोणताही रोग आढळला नसून अंडी-चिकन खाणे सुरक्षित असल्याची माहिती ही यावेळी राजपूत यांनी दिली. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद, ग्रामीण भाग व ग्रामसेवकांना याबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांचे पालन जिल्ह्यामध्ये होत असल्याचे माहिती यावेळी देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या