- हुलकावणी देत मंत्र्यांनी शोधली पळवाट !
- पालकमंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय ? आंदोलनकर्त्यांच्या प्रश्न ?
चंद्रपूर : वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित देशमुख तसेच मंत्री,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री चंद्रपूर ना.विजय वडेट्टीवार हे आज दिनांक 27 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1:15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,नियोजन भवन, चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना डेरा आंदोलनातील कोविड योध्द्यांच्या भावनांचा उद्रेक अनावर झाला. त्यांच्या उद्रेकासमोर अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व पालकमंत्री नाम. विजय वडेट.टीवार यांना पळवाट शोधावी लागली. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी डेरा आंदोलनातील कोव्हीड योद्ध्यांना ठेचून काढण्याची भाषा बोलली होती, वातावरण तापल्यानंतर एक पाय मागे घेत क्षमा मागुन पालकमंत्र्यांनी लवकरचं डेरा आंदोलनातील कोविड योद्ध्यांचे मानधन घेऊन देण्यास आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते आज त्या आश्वासनाची पूर्ती झाली नाही म्हणून डेरा आंदोलकांनी थेट अनिल देशमुखांना गाठले, परंतु मंत्र्यांना पळवाट शोधावी लागली.
7 महिन्यांच्या थकीत पगारासाठी मागील जवळपास तीन महिन्यापासून डेरा आंदोलन करणाऱ्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या भावनांचा आज पुन्हा एकदा उद्रेक झाला.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवन येथे अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू असताना मागील बाकावर बसलेल्या तीन कोविड योध्द्या महिला कामगारांनी थकीत पगाराबाबत मंत्री देशमुख यांना धारेवर धरले.यावेळी कामगारांच्या भावनेचा उद्रेक झाला. आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या नंतर महिला कामगार थकित पगारासाठी ढसाढसा रडायला लागल्या. कामगारांचा उद्रेक पाहून अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सह नियोजन भवनातून पळ काढणे सोयीस्कर समजले.
नियोजन भवनातून बाहेर निघाल्यानंतर सुद्धा गनिमीकाव्याने बाहेर उभ्या असलेल्या कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना
घेरले.देशमुख यांच्या समोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.त्यांचा निषेध करण्यात आला तसेच गो-बॅक अमित देशमुख चे नारे लावण्यात आले.'थकीत पगार द्या,मगच जिल्ह्यात या,असे नारे लावण्यात आले.परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर येथुन सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये पळ काढला.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 'गो-बॅक' अमित देशमुख चा नारा दिला होता.'आधी कोविड योध्द्यांचे थकित पगार द्या, मगच चंद्रपूर जिल्ह्यात या' असा इशारा पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दंगा पथक व पोलिसांचा फौजफाटा अमित देशमुख यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आला होता. पप्पू देशमुख यांच्यामागे सुद्धा काल रात्रीपासून पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा ससेमिरा लागला होता.या सर्वांना बगल देत जनविकास सेनेच्या कामगारांनी गनिमी काव्याने आज अमित देशमुख यांना पळवुन लावले.
जोपर्यंत थकित पगार व किमान वेतन लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील बी कामगारांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भावना सुद्धा यावेळी जन विकास चे अध्यक्ष पप्पु देशमुख यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या