- दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पास करणार?
- शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक !
मुंबई : महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर उद्यापासून दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही बैठक बोलवली होती. या बैठकीत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा झाली.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पास करणार?
नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय घेण्यात आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबात कोणताही निर्णय झालेला नाही. त्या संदर्भातील परीक्षांबाबत चर्चा बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील पास केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान नियोजित
नव्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान नियोजित आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं नियोजित केलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
पहिली ते आठवी सरसकट पास
च्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कोव्हिडची परिस्थित लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल
0 टिप्पण्या