- भरवस्तीतील हा जैविक कचरा जाळला 24 तासांच्या आत !
- पण हा जैविक कचरा आला कुठून... ! या बेजबाबदारपणा ला जबाबदार कोण !
- आणि कोणाचे आहे हे षडयंत्र, शोध घेणे गरजेचे...!
चंद्रपूर : चंद्रपुरातील दुर्गापुर कडे जाणारा सुमित्रानगर हा उच्च शिक्षित लोकांची भरगच्च वस्ती! याच वस्तीमधील गॅलक्सी सुपर मार्केटच्या बाजुला रुग्णांना देण्यात येणारी इंजेक्शन, वापर केलेले (निडल्स)सुई, सलाईन, औषधांची रिकामे झालेले बाॅटल्स व इतर साहित्य रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याचे चित्र शनिवार दि. २२ मे रोजी RM media सेंटर च्या जागृत प्रतिनिधीला दिसले. पत्रकाराने या संदर्भात रुग्णालयामध्ये वापरण्यात येणारे हे साहित्य या ठिकाणी कसे काय याची चौकशी केली परंतु यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही असे सांगितल्यानंतर RM media सेंटर च्या "त्या" जागरूक पत्रकाराने त्याचे छायाचित्र काढले अधिक ची माहिती घेतली असता .मुख्य रस्त्यालगत डाॅ.प्रणिता ओसवाल यांचे डोळ्यांचा दवाखाना असून मागील काही महिन्यांपासून हा दवाखाना बंद असल्याची माहिती मिळाली. महत्वाचे म्हणजे ज्या पद्धतीच्या जैविक कचरा या ठिकाणी टाकण्यात आला होता त्यामधील साहित्य हे मेडीकल फिजिशियन किंवा सर्जन यांचेकडे वापरण्यात येणारे होते. यासंदर्भातील video काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी सदर पत्रकार गेला असता हा संपूर्ण जैविक कचरा जाळण्यात आल्याचे दिसले. या संदर्भात शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे चौकशी केली असता त्याबाबत सुज्ञ नागरिकांनी अनभिज्ञता दर्शविली. आवश्यक बाप म्हणजे हा "जैविक कचरा" भरवस्तीत ज्या बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाकला असेल त्याचा शोध घेऊन त्यावर महानगरपालिकेने कारवाई करणे आज तरी गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे शेजारीपाजारी कुठे आपल्या घरी एखादी क्लीनिक सुरू करून एखादा फर्जी डॉक्टर व्यवसाय तर करीत नाही ना याचीही चौकशी व्हायला हवी. घरातून निघणारा औषधांच्या कचरा हा एवढ्या मोठ्या स्तरावर रहात नाही असे शेजाऱ्यांची म्हणणे आहे.
सध्याचा काळात कोरोनाने अख्ख्या जगाला विळखा घातला आहे.अनेकांचा यात नाहक बळी गेला आहे.गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे.अश्यामुळे कोरोना सारख्या रोगाला व इतर रोगाला आमंत्रण मिळत आहे.या प्रकारामुळे वार्डातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परीसराच्या जवळपास कुठेही कोणतेही रुग्णालये नाहीत.
जैविक कचऱ्याविषयी अधिक ची माहिती काढली असता प्रत्येक क्लिनिक, नर्सिंग होम, दवाखाने या ठिकाणाहून जैविक कचरा उचलण्यासाठी विशेष गाडी फिरत असल्याची अधिकृत माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञाकडून मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याचा असणाऱ्या प्रत्येकांना या फिरणाऱ्या गाडीमध्ये जैविक कचऱ्याची छाटणी करून गाडीमध्ये तो कचरा जमा करावा लागतो मग भरवस्तीत पडलेला हा जैविक कचरा आला कुठून याचा शोध महानगरपालिकेने अवश्य घ्यायला हवा, अशी मागणी या परिसरातील नागरिक करिता आहे.
0 टिप्पण्या