"ऑनलाइन" शिक्षणाने मुलांसोबतचं पालक झालीत वेडी !



"शिक्षणाच्या आईचा घो"...!

शाळा अन् शिक्षकांविनाचं मुलांनी गाठली पुढली इयत्ता !

चंद्रपूर : "गुरु विना विद्या नाही", "छडी लागे झमझम, विद्या येई घमघम" अश्या म्हणी दृढ झालेल्या आहेत. पालक आपल्या पाल्यांना घरी कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी पाल्य (विद्यार्थी) ऐकत नाही असे बहुतेक ठिकाणी बघितले जाते. परंतु मागील दोन वर्षापासून कोणताच विद्यार्थी हा शाळेमध्ये गेलेला नाही. कोरोना च्या भितीने व शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थी घरातच बसून "आॅनलाईन"? अभ्यास विद्यार्थ्यांच्या सुरू आहे. आता ऑनलाईन अभ्यास म्हणजे शाळेत बसून किंवा घरी राहून गुरुजींनी पाठविलेले पुस्तकांची पाने किंवा युट्युबवरून उचललेला एखादा व्हिडिओ असे एकंदर दर्शन पालकांना आलेले आहे. जर घरात बसून विद्यार्थी काही शिकत असतील तर शाळेची आवश्यकता तरी काय आहे ? शाळेमध्ये फलकावर खडूने लिहिलेले जे विद्यार्थ्यांना समजते ते ऑनलाईन मध्ये समजण्याइतकी क्षमता आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न! त्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षक ऑनलाइन शिक्षण घेताना पालकांना आपल्यासाठी एका वेगळ्या मोबाईलची व्यवस्था करावी लागली, त्याच्यात दर महिन्याच्या रिचार्ज यासोबतच पाल्यांंच्या अभ्यासाकडे लक्ष देनं. या सगळ्याच बाबी पालकांसाठी आज डोकेदुखी ठरली आहे. पाल्यांच्या हातामध्ये मोबाईल यामुळे त्यांना विविध विकारांना भविष्यामध्ये सामोरे जावे लागेल. याचा विचार शासनाने कधी केला कां? बेरोजगार झालेले पालक आज विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासामुळे हतबल झाले आहेत. त्यातच ज्या शाळेमध्ये आज पाल्य शिकत आहे त्या शाळेची महिन्याची फी ही लागलेली आहे. रोजगार गमावलेले पालक व पाल्यांना शिकविण्यासाठी त्यांची होणारी "मरमर" याचा विचार शासनाने अवश्य करायला हवा. शैक्षणिक संस्था म्हणजे आजच्या स्थितीत व्यवसाय झाला आहे. आम्हाला शिक्षकांचे पगार द्यावे लागतात असे या शैक्षणिक संस्थेचे म्हणणे म्हणजे "मृताच्या टाळूवरील लोणी" खाण्यासारखा प्रकार आहे. "शिक्षणाच्या आईचा घो" अशी स्थिती झाली आहे.
इयत्ता पहिलीच्या वर्गात पडलेले पाऊल म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात होय याच वर्गात बोबड्या बोलात बाराखडी आणि सवंगड्यांसोबत बालगीतांचा सूर आवळला जातो आणि सरत्या शैक्षणिक वर्षात कोरोनाने शाळेत प्रवेशीत झालेल्या पहिलीच्या चिमुरड्यांसाठी शाळेची घंटा वाजली नाही त्यामुळे पहिल्या वर्गात दाखल झालेले विद्यार्थी शाळा अन शिक्षक न पाहताच गेली दुसर्‍या वर्गात.
मागील वषीर्पासून कोरोनाच्या प्रादुभावार्मुळे प्राथमिक शाळा बंदच राहिल्या जे शिक्षण द्यायचे होते ते ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले शासनाने इयत्ता पहिली ते आठवी पयर्ंत सर्वच मुलांना पास केले इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळा पाहायला मिळाली ना शिक्षक पाहायला मिळाले. शाळा व शिक्षकांचे तोंडही न पाहणारे विद्यार्थी दुसरीत गेले. अशा स्थितीमुळे शिक्षणाच्या भविष्याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच गेला परिणामी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले मध्यंतरीच्या काळात काही दिवस कोरोनाची स्थिती सुधारल्याने इयत्ता दहावी व बारावीच्या तासिका कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यात आपल्या कालांतराने इयत्ता आठवी, नववी, इयत्ता पाचवी पयर्ंतच्या वर्गांना परवानगी देण्यात आली मात्र वर्षभरात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले. ग्रामीण भागातील बर्‍याच कुटुंबातील पालकांना आजही स्मार्टफोन कसा हाताळला जातो याचे ज्ञान नाही आणि सर्व शिक्षण तर ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे मागीलवर्षी प्रत्यक्षात शाळेतील संवगड्यासोबत अध्ययन करण्याची संधी गमवावी लागली आहे. यावर्षीसुद्धा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सध्या शासन २८ जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू होणार असल्याने यावर्षी तरी शाळेत जाण्याची संधी मिळेल की नाही असे विद्यार्थ्यांना वाटू लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या