उद्या "गडचांदूरात तंबाखू ban" साठी रॅली!



  • बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा गडचांदूरातील मुख्य विक्रेता "कीडीला" आयपीएल online व्यवसायात ही सक्रीय ?

कोरपना (प्रति.)
गडचांदूर शहरात उद्या गांधी जयंती दिनी आशुतोष ढोके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन "गडचांदूरात तंबाखू ban" साठी रॅलीचे आयोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री करणारे चार-पाच मुख्य विक्रेते आहेत.

यातील "कीडीला" नावाचा मुख्य विक्रेता हा मागील अनेक वर्षांपासून गडचांदूर शहरामध्ये बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री मध्ये सक्रिय सहभागी असून विश्वस्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडचांदूर चा हा "किडीला" नामक व्यापारी आयपीएल ऑनलाईन सट्याच्या betting मध्ये सक्रीय असून lockdown काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची विक्रीतून पोलिसांना "अंडा" दाखवत करोडोंची माया या "किडीला" ने कमविली आहे. आपल्या लाभासाठी विविध पक्षात प्रवेश करणे, स्वतःचे मोठमोठे बॅनर लावणे हा या "किडीला" चा छंद आहे. हा "किडीला" कधी कोणत्या पक्षात राहील याचा नेम नाही. आयपीएल ऑनलाईन सट्ट्यावर नुकतीच गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील सूत्रधारांना ही या ठिकाणी अटक करण्यात आली. या आॅनलाईन क्रिकेट सट्टा व्यवसायाची सुत्रे ही चंद्रपूर जिल्ह्यांमधून हलविल्या जात असून मूख्य सुत्रधार हे नागपूरात असल्याचे यापूर्वी या रॅकेट चा पोलखोल करणाऱ्या गडचिरोली च्या पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. गडचांदूर शहरातील बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा मुख्य विक्रेता असलेला "किडीला" चे उघड झालेल्या online IPL सट्टा रॅकेट शी काही संबंध आहे कां? याचा ही तपास व्हायला हवा.

गडचांदूर शहरामध्ये नुकतेच सत्यजित आमले यांनी ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळला आहे. पोलिस निरीक्षक आमले यांच्याकडून गडचांदूर वासियांना अनेक अपेक्षा आहेत. अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या आमले साहेब मुसक्या आवळतीलच असा शंभर टक्के विश्वास गडचादुरकरांना आहे. गडचांदूर चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आमले यांनी या "किडीला" च्या मुसक्या अवश्य आवळाव्या, गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत "किडीला" यांच्याही तपास करून बेड्या ठोकाव्या, अशी अपेक्षा गडचांदूर करांना लागली आहे. पैशासाठी काहीही करायचे अशी नीती असलेल्यांचे प्रमाण कमी नाही. गांधी जयंती दिनी गडचांदूर शहरामध्ये बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या विरोधात आशुतोष ढोके या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन केलेले रॅलीचे आयोजन, ही अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित विभागाच्या बेईमान अधिकाऱ्यांना चपराक आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यासाठी ज्यांची शासन दरबारी नियुक्ती होते, तेच कर्तव्यापासून पळ काढत असेल तर त्यांनी शासनाचा पगार नाकारायला हवा.असा संदेशच ढोकेआ या शिक्षकाने गांधी जयंती दिनी आयोजित केलेल्या रॅली मधून जात आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्यासाठी संबंधित विभागाने अवश्य कारवाई करावी, हीच पेक्षा गडचांदूरकरांना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या