- बडे-बडे सिंहासन और बडी बडी प्रतिमाओसे बडा साम्राज्य नही बनता राजमाता!"बाहुबली चित्रपट
- सत्ता, खुर्ची याचा माज दीर्घ काळ नसतो, राजकारण हा पैसा कमाविण्याचा धंदा नाही.!
चंद्रपूर : माजी वित्तमंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष आम. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा जनता दरबार हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वपरिचित आहे. आज बुधवार दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी सुधीरभाऊंच्या कस्तुरबा चौकातील कार्यालयात कोरोना संक्रमनामुळे फार दिवसानंतर हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात समस्या, तक्रारी, निवेदने घेऊन येणाऱ्यांची तोबा गर्दी असते, हे प्रत्येकालाच माहित आहे. येणाऱ्या प्रत्येकांचे सुधीरभाऊ कडून समाधानही होत असते, याची कल्पना अनेकांना आहे. सत्तेत नसून ही मुनगंटीवार यांच्या जनता दरबारामध्ये येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे.
न थकता, न रागावता आलेल्यांचे समाधान या सिद्धांतावर मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या "भाऊं" च्या जनता दरबारात विरोधकही हजेरी लावतात परंतु तेच विरोधक फक्त हेच बाहेर बोलण्यास टाळतात, हीच सुधीरभाऊंची जनता दरबाराची व त्यांच्या स्वभावाची विशेषता आहे! "आलेल्या प्रत्येकाचे समाधान!" यासाठी आलेल्या प्रत्येकांना चहा-पाणी याची व्यवस्था असतेचं असते. जेवढे लोक हाॅल मध्ये, तेवढेच लोक केबिनमध्ये सुद्धा असतात. प्रत्येक भेटायला येणाऱ्यांची नोंद काउंटरवर केली जाते, ते ज्या कारणासाठी भेटायला आले आहेत, त्याचीही नोंद होते. कार्यालयीन कर्म़चाऱ्यामधूनचं एखादा आपली नोंद झाली काय? भाऊंची भेट झाली काय? यांची आवर्जुन चौकशी प्रत्येक दहा-दहा मिनीटांनी करीत असतो.
बहुतेकांच्या समस्या विविध विभागांमधील, काहींच्या मंत्रालयातील, तर काहींच्या वैयक्तिक असतात, प्रत्येक विभागांमधील समस्यांच्या नोंदी घेऊन त्या-त्या विभागात, मंत्रालयात पत्र देणे, ते पत्र मिळाले कां? यासंबंधात चौकश्या करून त्यांना पत्र त्वरित मिळावे, यासाठी कर्मचारी प्रत्येक दहा-दहा मिनीटानंतर आलेल्यांची विचारणा करीत असतो, त्याची नोद ही केल्या जाते. त्याची माहिती "भाऊं" पर्यंत पोहोचविल्या जाते.
प्रत्येकांची भेट घेतल्याशिवाय "भाऊं" चा जनता दरबार समाप्त होत नाही याची ज्यांना कल्पना नसते ते व आपण विशीष्ट आहोत, सामान्य नाही असे समजणारे व यातील अनेक जण आपली भेट होणार नाही या अपेक्षेने हाॅल व केबिनच्या मधात उभे असतात. त्यातील काही कर्मचाऱ्यांशी, विशीष्ट पदाधिकाऱ्यांशी जवळीक साधून केबीनमध्ये शिरण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात. परंतु तसे न करण्याची स्पष्ट सुचना बहुतेक कर्मचाऱ्यांना-पदाधिकाऱ्यांना दिल्या असतील याच कारणास्तव अनेक व्हीआयपी सुद्धा आपला नंबर येण्याची वाट बघत असतात.
ज्यांनी आपल्या भेटीसाठी नोंद केली आहे व ज्यांची भेट झाली नाही किंवा जे निघून गेले अशांना सुधीर भाऊ स्वतः फोन करून येण्याचे कारण विचारत असतात, असाही अनुभव अनेकांना आला आहे. ही "सुधीरभाऊं" च्या जनता दरबारातील वैशिष्ट्ये आहेत.
आत्ता आत्ता नवख्या असणाऱ्या राजकारण्यांनी-समाजसेवकांनी आपला तोरा सोडून राजकारणात यशस्वी होण्यासाठी सुधीरभाऊ पासून हे वैशिष्ट्यपूर्ण गुण अवश्य घ्यायला हवे. सत्ता, खुर्ची याचा माज दीर्घ काळ नसतो, राजकारण हा पैसा कमाविण्याचा धंदा नसतो या आशयाचे विकासपुरुष नितीन गडकरी यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ सोशल माध्यमांवर सध्या व्हायरल होत आहेत, अनेकांनी ते बघितलेसुद्धा असतील. अनेकांना या अवस्थेतून निघाल्याचे आपण साक्षीदार असू शकता.
राजकारणामध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या नवख्या तरुणांनी यापासून अवश्य बोध घ्यायला हवा. सुधीर भाऊ चा जनता दरबार, त्यामध्ये होणारी गर्दी ही नवख्या समाजसेवकांना-पदाधिकाऱ्यांना बरेचं काही सांगणारी आहे.
येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी अनेक लोक विविध पक्षातून निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्या प्रत्येकाने भविष्यामध्ये राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर समाजकारणाची जोड त्यांना आवश्यक आहे. सामाजिक समस्यांचे भान, समस्यांची जाण, समस्या यावर त्यांचे गांभीर्य राहिले तरच शहरामध्ये, जिल्ह्यामध्येव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख ते निर्माण करू शकतात.
बुद्धीचा विकास माणसाच्या अस्तित्वाचे अंतिम लक्ष असायला हवे. असे विद्वानांनी सांगीतले आहे, थोडेसे यश, त्यात आलेला माज हा दिर्घकाळ नसतो.
"बडे-बडे सिंहासन और बडी बडी प्रतिमाओसे बडा साम्राज्य नही बनता राजमाता!" हा डायलॉग करोडो रूपये कमाविणाऱ्या संगणकाद्वारे निर्मीत सुप्रसिद्ध चित्रपट बाहुबली-2 यातील आहे, बाहुबली ची पत्नी देवसिन्हा हिला गर्भावस्थेमध्ये हाथकडी टाकून कैद केल्यानंतर बोललेला हा डायलॉग या चित्रपटांमध्ये यश आणून गेला, करोडो रुपये कमावलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटातील हा डायलॉग अनेकांसाठी फार काही सांगणारा आहे. फक्त बॅनर, पोस्टर व सोशल माध्वयमांवर मोठे दिसणारे जसे दाखवितात तसे नसतातच या आशयाचा संदेश देणारा बाहुबली या चित्रपटातील हा डायलॉग आहे. अनेक तरुणांनी हा चित्रपट बघितला आहे. बोध देणाऱ्या या संदेशाला बहुतेक तरुणांनी कानाडोळा केला असेल, दिखाव्यावर जावू नका असा संदेशचं यामधून मिळतो. याकडे तरूणांनी दुर्लक्ष करू नये.
0 टिप्पण्या