वसिमचे झिंगरी चे ठिक, पण त्या गुप्ता' चे आणि अन्य चे काय ?




  • पुर्वीपासून चे व्यापारी जयसुख-मनसुख-नुतन-हरिश बांधव व्यापाऱ्यांची चौकशी कोण करणार?

  • सुगंधित तंबाखू च्या धंद्यात लाखोंची सेटींग व करोडोंचा व्यापार !

  • स्थानिक गुन्हे शाखा चे आत्तापावेतो चे कार्य प्रशंसनिय !
चंद्रपूर (वि. प्र.) : मंगळवार दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी सुगंधित तंबाखू ची विक्री करणाऱ्या वसीम अख्तर झिंगरी (३५) याला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या एमआयडीसी परिसरातील गोडाऊनमधुन संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखुचा पुरवठा करणाऱ्या वाहनाला जप्त करीत गोडाऊनची मालकी असणाऱ्या व अटक टाळण्यासाठी पळण्याच्या बेतात असलेल्या वसीमला शिताफीने अटक करून त्याचेविरोधात भादवी ३२८, २७३, १८८ अंतर्गत पोलिसांनी वसीमचा ५ दिवसांचा पिसीआर मागितला. मिळालेल्या माहितीनुसार वसीमला १ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती आहे. हा वसिम सुगंधित तंबाखू चार व्यापार करणारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा व्यापारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा व्यापार चंद्रपूरात सुरू असुन यापुर्वी ही अन्न व प्रशासन विभागाने यातील अनेकांवर कारवाई केली आहे, जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिस विभागाने यासंदर्भात पोलिस कस्टडी ची मागणी केली, ही बाब महत्वपूर्ण आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा ही याबद्दल अभिनंदनास पात्र आहे अन्न प्रशासन विभागाने ही अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये २६, २६ (२),(१), २६, (२), (४), २७ (२)(सी), ३०(२)(अ) अंतर्गत वसीम झिंगरी याचेवर गुन्हे दाखल केले आहे. येणाऱ्या दोन दिवसात वसिम झिंगरी यांचेकडून पोलिसांना व अन्न प्रशासन विभागाला अन्य काही मोठे मासे गळाला लागतात काय याची माहिती अवश्य मिळेल. महत्वाचे म्हणजे कोरोना काळामध्ये वसीम झिंगरी हा बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा व्यापार करीत असल्याचे वृत्त पहिल्यांदा प्रकाशित होत होते. त्याचेवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. त्यापुर्वी हा व्यवसाय सुरू नव्हता का? हा संशोधनाचा विषय आहे.

मग पुर्वीपासून या अवैध व्यापारात सक्रिय असणान्यांचे काय ?

वसीम झिंगरी या व्यापारामध्ये सामील होण्यापूर्वी जयसुख-मनसुख-नुतन-हरिश या नातेवाईक असलेल्या बांधवाचे या व्यवसायात मोठे प्रस्थ होते आणि आहे. मिळालेल्या माहितीनुसार "गुप्ता" नावाचा एक व्यापारी या बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा व्यवसायात सक्रिय झालेला असून त्याचेवर आत्तापावेतो कोणतीच मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. 'गुप्ता' याचेवर कोणाचा वरदहस्त आहे, याचा शोध ही पोलिस विभागाने अवश्य घ्यायला हवा.

अन्न प्रशासन विभागाची भुमिका संशयास्पद !

बंदी असलेल्या या सुगंधित तंबाखूवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेला अन्न व प्रशासन विभागाची भुमिका ही नेहमीच संशयास्पद राहिली आहे. तंबाखुचा व्यापार करणारे याच अन्न प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून संपर्कात असल्यामुळे जिल्ह्यात हा व्यवसाय लाखोची बिदागी देवून करोडोचा व्यवसायात करीत असल्याचे सांगण्यात येते. मोजकेचं सहा-सात व्यापारी या व्यवसायात सक्रिय असुन त्यांचेवर यापुर्वी थातुर मातुर कारवाई अन्न व प्रशासन विभागाकडून करण्यात आल्यामुळेचं आरोग्यास हानिकारक व राज्यात बंदी असून ही सुगंधित तंबाखूचा व्यापार व फोफावला आहे. ज्यांचेवर यापूर्वी यासंदर्भात यापुर्वी अन्न व प्रशासन विभागाने गुन्हे दाखल केले आहे, त्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे गरजेचे आहे. 'गुप्ता' नावाच्या व्यापाऱ्याचे प्रस्थ वाढविण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याकडून जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा व्यापार फुलविण्याचा उपद्व्याप सुरू असुन या चर्चेची सुद्धा पोलिसांनी अवश्य तपासणी करून पुर्वीपासून या व्यवसायात सक्रिय असलेले भाऊ-बंदी व गुप्ता याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आत्ता या व्यवसायात सक्रिय असलेल्यांकडून होत आहे. महत्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली, गोंदिया सारख्या जिल्ह्यामध्ये हा बंदी असलेला तंबाखू पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या