फटाफट कॉपी-पेस्ट करून बातम्या लावणाऱ्यांनी लाज-शरम विकली कां?



चंद्रपूर : सध्याचे युग आधुनिक आहे, विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे, त्याचा प्रभाव हा सर्वच क्षेत्रांमध्ये दिसू लागला आहे, प्रसार माध्यमे ही त्यात मागे राहिली नाही. पुर्वी पुस्तके व अन्य माध्यमातून वाचन करून संकलन केले जात होते. आता गुगल वरून हवी ती माहिती त्वरित उपलब्ध होते. वाचन संस्कृती लोप पावली असे म्हणता येणार नाही परंतु लिखाणाला आता प्राधान्य कमी आहे. गुगल वर जे दिसते त्याची कॉपी करा आणि पेस्ट करा या प्रमाणात वाढ झाली आहे. जसेच्या तसे उचला आणि स्वतःच्या नावाने पोस्ट करा. "प्रसार माध्यमांमध्ये वाढलेला हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे." न्यूज पोर्टल चालविणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फटाफट बातमी उचला, पण ती वाचून घेतली असेल तर त्यामध्ये संशोधन करा आपल्या मनाने काहीतरी टाका बातमी फटाफट लावली, तर तुम्ही विद्वान नाही. हे तुम्ही सगळ्यात पुर्वी लक्षात घ्या. हा सगळा लेख प्रपंच करण्यामागे उद्देश हाच आहे.

मागील काही महिन्यापासून फटाफट बातमी कॉपी करून पेस्ट करा याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कॉपी करुन पेस्ट करणाऱ्या विद्वानांनी आपली स्वतःची लाज शरम विकून खाल्ली का याचा सगळ्यात पहिले विचार करावा? बातमी किंवा विश्लेषण लिहितांना विचार करावा लागतो त्यामध्ये काही वेळ जातो, एकाग्र राहणे आणि त्यानंतर बातमी विश्लेषण लिहिणे असा हा क्रम राहतो. मागील काही महिन्यापासून फटाफट कॉपी करा पेस्ट करा आणि स्वतःच्या पोर्टलवर लावा, आणि आम्हीच सगळ्यात विद्वान अशा फुशारक्या मारण्याचे काम सूरू आहे. एखाद्याचे वृत्त, बातमी, विश्लेषण कापी करतांना कमीत कमी त्याची सहमती घ्यायला हवी किंवा त्यांना एखादा शब्द सांगायला हवा जर काही कारणास्तव सांगू शकले नाही तर जिथुन बातमी जशीची तशी उचलली किंवा विश्लेषण उचललं त्याच्याखाली साभार म्हणून ज्यांचे वृत्त, विश्लेषण उचलले त्यांचे (साभार) म्हणून काहीतरी लिहायला हवं हे पत्रकारितेमध्ये सांगितले जाते.

नुकतेच चार दिवसापूर्वी साप्ताहिक विदर्भ आठवडी च्या न्यूज पोर्टल ला लागलेले आणि संपादक म्हणून आम्ही स्वतः लिहीलेले साहित्य, वृत्त आमचे पोर्टल वर व्हायरल होत असतांनाच एका दुसऱ्याने स्वत:च्या न्यूज पोर्टल वर जसेच्या तसे व्हायरल केले. *त्यांनी लाज शरम विकून खाल्ली कां?*

बातम्या, वृत्त, विश्लेषण लिहीणाऱ्यांना विचार करावा लागतो, भेटीगाठी घ्यावे लागतात. त्यानंतर असे वृत्त, विश्लेषण प्रकाशित होतात आणि लाज-शरम विकणारे त्याचीच कॉपी करतात आणि पेस्ट करतात मग त्या वेळेस कमीत कमी ज्यांची बातमी आहे किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही उचलली आहे त्याच्याखाली कंसामध्ये साभार म्हणून लिहिले तर तुमची नाक खाली जाणार नाही. ज्यांच्याबद्दल वृत्त आहे त्यांनाही कळते की कोणी लिहिले आहे. वरून लेखणी बहाद्दरांचे वृत्त कौशल्य कळते, स्वतःची वरवर करण्यात काही अर्थ नाही. यानंतर कुणाची बातमी उचलली कमीत कमी कुठून उचलली यासंदर्भात शेवटच्या प्याऱ्या मध्ये साभार अवश्य टाका. फक्त आमच्या वृत्तांना व आमच्या न्युज पोर्टल ला वाचक फार आहेत.  दूसऱ्याच्या बातम्या विचार न करता कापी-पेस्ट करीत असाल तर आम्ही सगळ्यात श्रेष्ठ असा भ्रम बिल्कुल ग्रह बाळगू नका. शबिना अदिम  या जगप्रसिद्ध
भारतीय शायराने  आपल्या शायरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, "...जरा सा कुदरतने क्या नवाजा, आकर बैठे हो पहिली सफ् (लाईन) में! अभी से उडने लगे हवा में अभी तो शोहरत नयी-नयी है." या पक्तींप्रमाणे आहे. उडा तेवढेचं जेवढी क्षमता आहे, असेचं याबाबत आम्हाला म्हणायचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या