वसिमच्या अटकेनंतर व्हायरल होत असलेला "तो" ऑडिओ, चर्चेचा विषय!



  • करोडोंच्या तंबाखुच्या व्यवसायात white collar नेत्यांचा समावेश?
  • चंद्रपूर च्या सायबर सेल ने ऑडिओ ची सत्यता बाहेर आणल्यास या प्रकरणात "मोठे मासे गळाला" लागण्याची शक्यता !

चंद्रपूर (वि. प्र.)
दोन दिवसापूर्वी वसीम नावाच्या एका सुगंधी तंबाखू चा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर लगेच एक ऑडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांने दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांला केलेला फोन त्याचा ऑडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. ऑडिओ मध्ये एका राजकीय पक्षाचा स्थानिक पदाधिकारी दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांला वसीम शी तुम्ही बोलले कां? तो आपलाच माणूस आहे, मग तुम्ही तक्रारी का बरं करीत आहे? आपल्या लोकांनी व्यवसाय करायचा नाही कां? वसीम हा आपलाचं आहे, असा प्रश्न विचारत मला भेटा.", अशा आशयाचा एक ऑडिओ मागील दोन दिवसापासून सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यांच्याविषयी हा ऑडिओ आहे त्यांनी सरळपणे "राजकीय द्वेशातून" हा आरोप केलल गेला आहे असे सांगितले. तो आवाज माझा नाही, "राजकीय द्वेशातून" असे करण्यात आले आहे, असा खुलासा करीत त्यांनी मी "त्यातला नाही" असे स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बंदी असलेला सुगंधी तंबाखूचा करोडो चा व्यापार, संबंधित विभागाला लाखोंची "बिदागी" मिळत असल्यामुळे करोडो च्या रूपाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागाच्या सायबर सेल ने व्हायरल होत असलेल्या त्या ऑडिओ क्लिप ची संपूर्ण चौकशी केल्यास जिल्ह्यातील या व्यवसायात सक्रिय असलेले काही स्थानिक "व्हाईट काॅलर" नेते पोलीस विभागाच्या गळाला लागू शकतात.

वरिष्ठ नेत्यांचे १००-२००/- रूपयांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे व "सगळे आमच्याच बापाचे" म्हणत चुकीचा व्यवसायाला सहयोग करायचे व लाखोंची कमाई करून आम्ही सरळ असा पावित्रा घ्यायचा, ज्या पक्षाशी हे संधीसाधू (भोगसाधू) संबंधित आहे, त्यांच्या मागे जनाधार किती आहे? त्याचा पक्ष वाढविण्यासाठी लाभ होईल कां? याचा ही पक्षाने अवश्य करायला हवा. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी "त्या" ऑडिओ ची संपूर्ण चौकशी करून कारवाई करणे, तेवढेच गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी निष्पक्षपणे "त्या" व्हायरल ऑडिओ ची चौकशी करून दोषींच्या मुसक्या आवळल्याचं हव्या.

शैतान एक रात में इन्सान बन गये 
जितने नमकहराम ते कप्तान बन गये

यासारखा हा प्रकार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या