"त्या" जुगारातील बहुतेक तत्व असामाजिक ?*



  • अप्पर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई प्रशंसनिय ! पण...

  • फक्त जुगार की अन्य कट? याचा ही तपास होणे गरजेचे !*

चंद्रपूर (वि.प्र.)

अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर-बल्लारपूर रोडलगत बाबानगर येथे ८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जुगार अड्डयावर धाड टाकून एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे वृत्त छायाचित्रासह वाचण्यात आले. एलसीबी च्या पथकाने अप्पर पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे केलेली ही कारवाई प्रशंसनिय व अभिनंदनास पात्र आहे. काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या कारवाईमध्ये राजुऱ्याचा गोलू ठाकरे, महाकाली कॉलरीचा राजेश गुप्ता, महाकाली वार्डातील प्रदीप गनगमवार, वणी चा हाफिज रेहमान खलील, शेख असिफ शेख चांद, कोलगांव चा नंदकुमार रामराव खापने, गडचांदुर चा गणेश रामदास, चंद्रपूरचा समीर सचिन, राजुरा लक्कडकोट चा आकाश रागीट, कोरपना तालुक्यातील नांदाफाटा चा गौरव बंडीवार, चंद्रपूर चे श्रीनिवास रामलु रंगेरी, सुरेश वावरे यांच्यासह एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले असून यांचेकडून 1 लक्ष 97 हजार 250 रुपये, 11 मोबाईल फोन, 3 चारचाकी वाहने, 3 दुचाकी वाहने असा एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे अपराध क्रमांक 858/2021 च्या कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या जुगारातील बहुतेक आरोपी हे असामाजिक तत्त्वांचे आहेत. यातील बहुतेकांवर अवैधरित्या जुगार-कोंबड बाजार चालविणे, अवैध दारू विक्री करणे असे जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. एकाच ठिकाणी विविध क्षेत्रात राहणारे असामाजिक तत्त्व एका ठिकाणी येऊन काही कट तर रचत नाही नां? याचाही तपास होणे गरजेचे आहे. जुगार खेळण्यासाठी जुगाराचे शौकीन एकत्र येतात. त्यानंतर धोका पत्करून किंवा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना "अॅडजेस्ट" करून जुगाराचे अड्डे चालविल्या जातात. परंतु ज्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे, त्यातील बहुतेक आरोपी स्वतः जुगार अड्डे, कोंबडा कोंबडा बाजार चालवितात ते एका ठिकाणी आले कसे ? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.

अवश्य वाचा :....

http://www.vidarbhaathawadi.in/2021/11/kombad-bazar.html

फक्त जुगार की अन्य कट? याचा ही तपास होणे गरजेचे !

"कोंबड बाजाराला "परवानगी" मिळविण्यासाठी जिल्ह्यात धावपळीला वेग!" या आशयाखाली साप्ताहिक विदर्भ आठवडी या न्युज पोर्टल ने गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी एक वृत्त प्रकाशित केले होते. हाफिज भाई च्या प्रवेशानंतर जिल्ह्यात दिवाळीनंतर कोंबडबाजार सुरू होईल, अशा आशयाचे हे वृत्त होते. त्यानंतर आमच्याच काही प्रामाणिक पत्रकारांनी फोनद्वारे सदर वृत्त खोडसाळपणा आहे, अशी कोणतीच मीटिंग झाली नाही किंवा अशा कोणत्याच धावपळी झाल्या नाहीत. सदर वृत्त हे खोटे आहे. या आशयाने आम्हाला फोनद्वारे सूचना व चेतावणी दिली होती. 8 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर पडलेली धाड व त्यात कारवाई झालेले हाफिज व अन्य हे फक्त जुगार खेळण्याच्या हेतूनेच एकत्रित आले होते की त्यामध्ये काही कट होता, याचाही तपास अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवश्य करावा. ज्या मित्रांनी आम्हाला मित्र म्हणून "ते लोग खुंखार आहेत." याची सूचना दिली, त्यांनीही शोध पत्रकारितेच्या माध्यमातून याचा तपास अवश्य करायला हवा. अन्यथा लेखणी तुमची पण आहे आणि आमची पण...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या