प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा प्रजासत्ताक दिनी गडचांदुर काँग्रेसला पडला विसर !





जाणीवपूर्वक नेत्यांना जाहिरातीतून डावलण्यात आल्याची चर्चा !

गडचांदूर (प्रति.) : गडचांदूर शहरात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तर काही वृत्तपत्रानाही काँग्रेस कमिटीतर्फे जाहिराती वितरित करण्यात आल्या. राष्ट्रीय नेते, प्रादेशिक नेतृत्व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पालकमंत्री नाम. वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार सुभाष धोटे यांचे सोबत गडचांदूर शहराचे नगराध्यक्ष, नगरसेवक सोबतच गडचांदूर शहराचे काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी या साऱ्यांचे फोटो वृत्तपत्रिय जाहिरातीत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दमदार नेतृत्व नानाजी पटोले व ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याच फोटोला या बॅनर व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित जाहिरातीत वगळण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहिरातीत वगळलेल्या फोटोमुळे गडचांदूर शहरात विविध चर्चा सुरू असून नाना पटोले व प्रकाश देवतळे यांच्या नावाला पदाधिकाऱ्यांची एलर्जी असल्यामुळे हे फोटो जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे. नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसला बळ देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या फोटोला डावलण्यात आल्यामूळे वेगळ्याच चर्चेला शहरात फुटले आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचाही विसर गडचांदूर काँग्रेस कमिटी ला कसा काय पडला की त्यामागेही काही वेगळी मानसिकता तर नाही नां? अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या