गडचांदूर शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर स्थानांतरित करण्यासाठी आता गडचांदूर भाजयुमो व मनसे ने ही कसली कंबर !



  • यापूर्वी जिल्हाधिकारी व दारूबंदी विभागाकडेही करण्यात आली होती मागणी !
  • व्यवसायात स्पर्धा नको, यासाठी दारू दुकानदारांची "लेन-देन"? ची चर्चा!

गडचांदूर : गडचांदूर शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर तीन किलोमीटर दूर स्थानांतरित करण्यात यावी यासाठी नुकतेच गडचांदूर भाजयुमोचे रोहन काकडे व मनसेचे राजू चौधरी यांनी नगर परिषदेला निवेदन दिले असून शहरातील देशी दारू दुकाने हटविण्याच्या मागणीला आता चांगलाच जोर धरू लागला आहे. यापूर्वी
विविध संघटनांसोबत पत्रकार संघाने ही अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला गडचांदूर शहरातील या देशी दारू दुकानांना शहराच्या बाहेर ३ कि.मी. हलविण्यात यावे, या आशयाचे पत्र दिले होते. त्या पत्राची दखल घेत 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदनाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता शहरात विविध राजकीय पक्ष व संघटनांनी यासाठी जोर लावला असून शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर हलविण्यात यावी अशी सामान्य नागरिकही आता मागणी करू लागले आहे.
जेमतेम लोकसंख्या असलेल्या गडचांदुर शहरात शहराच्या मध्यभागी चार ते पाच देशी दारूंची दुकाने आहेत. या देशी दारू दुकानांमुळे व दारूड्या मुळे पुरुष महिला, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

व्यवसायात स्पर्धा नको, यासाठी दारू दुकानदारांची "लेन-देन"? ची चर्चा!

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी स्थानांतरीत झालेल्या लांजेकर यांच्या स्थानांतरीत देशी दारू दुकानांला न.प. मध्ये प्रस्ताव मंजूर करून परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळ येथून जयस्वाल यांची देशी दारू दुकान स्थानांतरित करण्यासाठी न.प. मध्ये दोनदा प्रस्ताव ठेवण्यात आला परंतु या दोन्ही वेळेस तो नामंजूर करण्यात आला होता. जयस्वाल यांच्या स्थानांतरित देशी दारू दुकानाच्या प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी प्रस्थापित देशी दारू दुकानदारांनी व्यवसाय स्पर्धा नको याकरिता फार मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केल्याची चर्चा गडचांदूरात वर्तविली जात आहे. गडचांदुर न.प. मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. एका स्थानांतरित देशी दारू दुकानाला प्रस्ताव मंजूर करताना अडथळा आला नाही परंतु दुसरऱ्यांदा त्याच लोकांनी प्रस्ताव फेटाळला यामधील "आर्थिक" व्यवहार गडचांदूर शहरात आता चांगलाच चर्चिला जात आहे.
आता नागरिकांनी ही देशी दारूची दुकाने शहराबाहेरच्या घालविण्याची मागणी केल्यामुळे प्रस्थापित देशी दारू दुकानदाराचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या