मारोडा येथे कन्नमवार जयंती उत्साहात साजरी



मुल-मारोडा (प्रति.): महाराष्ट्राचे दुसरे माजी मुख्यमंत्री स्व. मा. सां. कन्नमवार यांची कर्मभुमी म्हणून ओळखल असलेले मारोडा या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १२२ वी कन्नमवार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमीत्त सकाळी ८ वाजता बेलदार समाज संघटना चे अध्यक्ष मा. अशोकराव पुल्लावार यांचे हस्ते झेंडावंदन, सकाळी १० वाजता मंगेश बत्तुलवार, साईनाथ भुपतवार यांचे सहकार्यातुन रक्तदान शिबीर तसेच दुपारी १२ वाजता विनोद नायकलवार व अतुल कागदेलवार यांचे आयोजनात संगीत खुर्ची व महिलांची रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायं. ६ वाजता महाप्रसाद व विजेत्यांना बक्षिस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात १४ रक्तदात्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातर्फे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता अनिल नरेलवार, गजाननराव कोलप्याकवार, अनुप नेरलवार, चंद्रकांत मुद्दमवार, श्रीमती वैशालीताई पुल्लावार, सौ. स्वातीताई पुनकटवार, राजुजी चर्लावार व सर्व बेलदास समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या