ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे !
चंद्रपूर : 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटात उच्चवर्णियावर काश्मिरी पंडित व इतर यांच्यावर अत्याचार दाखवून दोन धर्मात धार्मिक सलोखा निर्माण करण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचे काम सर्मथनीय नाही.
मात्र, हजारो वर्षे करोडो शूद्र व अतिशुद्र जातींना उच्चवर्णियांनी जी अमानुष वागणूक दिली त्याची नवीन पिढीला जाणीव करण्यासाठी 'बहुजन फाइल्स'सारख्या सिनेमाची आज नितांत गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणालेकी, विसाव्या शतकात मनुस्मृतीसारख्या ग्रंथांची होळी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजावरील अन्यायाला वाचा फोडली होती. हे सत्य कधीही बहुजन समाज विसरणार नाही. उच्च वर्णियांच्या अनेक अमानुष प्रथा इंग्रजांच्या काळात कायदे करून नष्ट केले असले तरी उच्च वर्णियांच्या प्रथा आजही बहुजन समाजावर अन्याय करीत असल्याचे दिसून येते. हजारो वर्षांपासून उच्चवर्णीय समाज बहुजन समाजाच्या कष्टाच्या, र्शमाच्या भरोष्यावर पंचतारांकित जीवन उपभोगीत आहे. त्या बहुजन समाजाला साधे शिक्षण घेण्याचे तरी दरवाजे उघडे होते काय? अशी फिल्म बनवायला हवी की, ज्यातून बहुजनांवरील अत्याचार उघडकीस येऊन तसेच भारतातील समाजाला आज भेडसावणार्या ज्वलंत समस्या महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, आरक्षण, कृषी यावर चर्चा होऊ शकेल. त्यातून सर्वांचा विकास साधला जाऊ शकेल आणि सुजलाम-सुफलाम भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल, असे विचार ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले.
0 टिप्पण्या