"परवानगी मिळाली नाही, सत्राशे साठ पार्टनर आहे, सर्व्याले चिंधी-चिंधी भेटणार,! माहो नांव आलं तर तुम्ही आहोत न् मी आहे !"-कोंबडंबाजार वाल्याने स्वतः: दिली कबुली !
रंगपंचमीच्या दिवशी विदर्भातून येणार शौकीन, लाखोंची होणार उलाढाल, गडचांदूरात चर्चा !
एलसीबीने करावी कारवाई, नागरिकांची मागणी !
गडचांदुर : अवैध धंद्याचे मुख्य स्थान असलेल्या गडचांदूर शहरात आज शुक्रवार रंगपंचमीपासून मोठ्या स्तरावर कोंबड बाजार सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. एक महिन्यासाठी स्थानिक स्तरावरून ही परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. गडचांदुरातील एक नगरसेवक यात भागीदार असून शहरातील एका बड्या नेत्याचा नातेवाईक म्हणून सांगणाऱ्या व पोलिसांच्या यादीत असलेल्या प्रतिष्ठीत (?) व्यक्तीने या कोंबडं बाजार चालविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे कळते.
परवानगी मिळाली नाही, सत्राशे साठ पार्टनर आहे, सर्व्याले चिंधी-चिंधी भेटणार,! माहो नांव आलं तर तुम्ही आहोत न् मी आहे ! काही महिन्यांनंतर कलकत्त्याला मोठे काम सुरु होणार आहे. फक्त एक दिवस चालविण्यासाठी ही परवानगी आहे. माझे नाव आले तर बघून घ्या. ! चोरी आणि सिनाजोरी म्हणतात ते यालाच ! आपण काही चुकीचे करत आहोत, हे या चोरांना कळतचं नाही.
रंगपंचमी पासून गडचांदुरमध्ये कोरपना रोडवर सूरू होणारा हा कोंबड बाजार जिल्हा पोलिसांना आव्हान देणारा आहे. स्थानिक गुन्हे शाखेने यावर अवश्य कारवाई करावी, अशी नागरिक मागणी करीत आहे.
0 टिप्पण्या