- ग्राहकांची वाईन शॉप मध्ये तुंबड गर्दी, चढ्या दराने दारूची विक्री !
- आबकारी विभाग खाऊन-पेऊन मस्त !
चंद्रपूर (वि.प्र.) : आज होळी, उद्या धूळवड (रंगपंचमी) ! खाऊन-पेऊन साजरा करायच्या धूळवड हा समजणाऱ्या साठी हक्काचा सण(?) असतो. आज शहरात बाजारात तुंबळ गर्दी आहे जास्त गर्दी दिसत आहे ती वाईन शॉप व दारू दुकानामध्ये ! बार पेक्षा कमी दराने वाईन शापमधून उद्या बंद असते म्हणून आजचं उद्याचा "कोटा" घेण्यासाठी दारूडे गर्दी करतात.
आज शहराच्या मुख्य मार्गावर फेरफटका मारला असता अनेक वाईन शापसमोर दारूड्यांची "लुट" होत असल्याची ओरड सुरू आहे. वाईन बारच्या दरापेक्षा वाईन शाप मध्ये एमआरपी पेक्षा जास्त दराने दारू विक्री सूरू असल्याची शौकीनांची ओरड सूरू आहे. कुणाला सांगता ही येत नाही व बोंबलता ही येत नाही, एवढी तुफान गर्दी वाईन शापमध्ये बघायला मिळते. जिल्ह्यात दारूबंदी हटल्यानंतर दारू वर नियंत्रण ठेवणारा आबकारी विभाग हा नेहमी संशयाच्या घेऱ्यात राहीला आहे. या विभागाचे कर्मचारी-अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात "मालसुताऊ" अभियान सुरू केले आहे. प्रत्येक वाईन शापसमोर कोणत्या दरात कोणती दारू मिळेल ? याचा दर्शनी भागात दर पत्रक लागायलाचं हवे. ते लागले की नाही यावर देखरेखीचे कर्तव्य असलेला या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कधिचं लेण-देणीतून लक्ष दिले नाही. कोणत्याची बार-शाप मध्ये तक्रारीसाठी कोणताही मोबाईल किंवा लॅन्डलाईन नंबर लिहीलेला नाही. याचा फायदा घेत आज हजारो ग्राहकांची लाखोंनी लुट वाईन शाप मालकांनी सूरू केली आहे. जिल्ह्यात दारू बंदी हटल्यानंतर ही हजारोच्या संख्येने अवैध दारु विक्री करणारे दारूविक्री करीत आहे परंतु त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई आबकारी विभागाने अद्याप केलेली नाही.
बरं...! या अवैध दारु विक्रेत्यांकडून येणारी दारू ही वाइन शप मधूनच येत असल्याचे सांगण्यात येते. त्या संबंधात कधी आबकारी विभागाने सखोल चौकशी ही केली नाही. वाईन शाप मधून विक्री होणारी दारू परवाना धारकांसोबत पेट्यांच्या संख्येने अवैध दारू विक्रेत्यांना पूरवठा केली जात आहे. आजच्या फेरफटक्या दरम्यान उद्या शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी रहावी बंद च्या पार्श्वभुमीवर याच वाईन शाप मधून खूले आम पेट्यांच्या संख्येत दारू ढोहळतांना दिसले. कशी राहील शांतता अबाधित ! फक्त पोलिसांवर खापर फोडून काय फायदा ? आबकारी विभाग "मालसुताई" धोरणामध्ये मस्त आहे.
लवकरच वाचा...!
*उद्यापासून गडचांदूरात कोंबडं बाजार जोरात ?कुणाचा व कुठे? कुणी दिली परवानगी? कोण आहे म्होरक्या?*
0 टिप्पण्या