आने नवरी वऱ्हाडी भाऊ मया झाडीतला
धान फुलाच्या संगती वास पराटिले आला
२९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा अहवाल कवितेत!
*झाडीचा चमक्या गोटा लक्ष्मण*
*यान बहू मोठा काम केलन*
*हिम्मत करून सोता भाऊनं*
*डगर मोठा संमेलन पुरा केलन*
*सप्प्यायच्या आंदी इस्वसात*
*घेऊन गावच्या सरपंचाले*
*भरवलन सभा गावकऱ्यायची*
*संमेलनाबद्दल सांगावाले*
*का सांगू भाऊ तुले लोकही सप्पे*
*एका दणक्यात तयार झाले*
*अन लहान मोठ्यापरत गोरगरीब*
*गावकरी वर्गणी जमा केले*
*जसे जसे दिवस सरत होते*
*लागला गाव कामाले*
*वाटणी झाली कामाची परतेकाले*
*का कोणता काम कोणाले*
*सजला गाव एकूण एक अन*
*सफाई झाली गावाची*
*सफाई झाली अश्या अश्या जागेची*
*जे होती फक्त हागाची*
*उभा झाला मांडव रंगसे रंग परदे*
*अन चौकट अंदर जावाची*
*तोरण रांगोळ्या गावभर डिकल्या*
*स्यान पिवर जूनासुर्ला गावाची*
*झाली रामपाहर निंगली तिरीप*
*तारीख आली उजघाटनाची*
*दिंडी निंगली गावातून सप्प्या*
*अन घंटी वाजली देवळाची*
*एकूण एक गाव सप्पा सामील*
*झाला पुस्तकाच्या पोह्यात*
*अन नाना देव दिसले मलेही*
*लहान लहान पोऱ्यात*
*येळकोट मल्हार मनत आले*
*धनगर गावचे फेरीत*
*मेंढपाळ समाज नाचून*
*सांगले खांदावच्या बकरीत*
*जय सेवा जय वाल्मीकाच्या*
*जयजयकाराने दणाणले रस्ते*
*सप्प्या जाती धर्म झाले एक*
*उरावर घेऊन नाचले रस्ते.....*
*ढोड्यात गेला काम ना धाम*
*लहान मोठे पोरं ही सजली*
*कोणी झाला शिवाजी अन कोणी बिरसा*
*नाना वेशात गावची पोरं सजली*
*पोतराज,जोगवीबाई न त*
*कमालच केलन पोह्यात*
*नाचत होते गाण्यावर ते*
*सोटा मारत जोरात*
*उजघाटना गाव आला मांडवात*
*गर्दी नोहोतो मावत तेती*
*पोलिसान लदून आला भाऊ*
*थापूट्यायचा आवाज मोठा येती*
*एकच गर्जन झाला मांडवात*
*झाडी गौरव गाण्यानं*
*शाहीर नंदू भाऊच्या आवाजात*
*झाडीचा गौरव झाला मोठ्यानं*
*आले पावणे मोठमोठाले*
*विजयभाऊ मंत्री आमचे*
*पुजपाती कारूनश्यानी*
*बसले पावणे कारेकरमाचे*
*अरुण भाऊ झगडकर न लिवलन*
*गाना पक्क्या खोल अर्थाचा*
*कोसे मॅडम मनल्या गाना चोकट*
*आवाजान स्वागत केला सप्यायचा*
*गावाईतल्या बाया माणसांची*
*गर्दी मोठी भेवलागण्याजोक्ती*
*असा भरला मांडव संमेकांनाचा*
*पाय ठेवालं जागाच नोहोती*
*रात्रीचे ते फसकीलास कारेकरम*
*पाहून पक्की मज्या आली*
*गोंडी गाण्यावर नाचले पोरं पोरी*
*दंडार पाहून सोभा आली*
*दुसऱ्या दिवसी कविसम्मेलनं*
*एकनंबर दिवस गाजला*
*झडीच्या कवींच्या नगदी चोकट*
*कवितायन संमेलन सजला*
*दोनही दिवस गोड जेवण*
*खादीचा कवी पोटभर खाल्ला*
*जेवनामंदी पाण्यासारखी*
*कडीही पावना मानमान्य पेल्ला*
*दिवस कल्टीच्या भारावलेल्या*
*शब्दान जिकलन मन लोकायचे*
*अरूणभाऊ बोललान जिकला*
*वैभव वाहाल्ले झाडीबोलीचे*
*सप्पे आले सप्पे लडले शब्दसादक*
*त्यायना जिकुन घेतला सप्प्यायले*
*बोढेकर सर, हरीचंद बावाजी*
*आहेत तवरी मरण नाही झाडीबोलीलं*
*आभार मानतो लक्ष्मणभाऊ*
*अन जूनासुर्ला गावाचे*
*यायच्या पासून झाले सप्पे*
*आता दिवस नाही हे येवाचे.......*
-संतोष मेश्राम, सिंदेवाही
0 टिप्पण्या