झाडी बोली साहित्य संमेलनातील अप्रतिम असे स्वागतगीत...!
स्वर्णप्रभाही निर्मल कोमल वाट बघे आपली
स्वागत करितो अतिथीगणांचे पसरावी सावली !!धृ.!!
तुम्हा प्रसादे मिळे सदाही मांगल्याचा स्वाद
चरण भूवरी पडता तुमचे निनादला तो नाद
*हरिश्चंद्राच्या* कृपाप्रसादे सोनकळा प्रसवली !!१!!
आदरभावे करितो स्वागत मन हे पुलकित झाले
कीर्तीगंध बोलीचा येता गावकरी थांबले
उधळावी ही पुष्प स्वरांनी आज तुम्हा पाऊली !!२!!
आस लागली मनात केवळ शब्द श्रवणी यावे
बोधामृत वदनातील ऐकून मन हे पुलकीत व्हावे
वीर बाबुराव शेडमाकेनी क्रांती इथे घडविली !!३!!
जनमन व्हावे संस्कारी अन् भाव अंतरी यावे
शब्द झाडीचे पडता कानी सानथोर हर्षावे
*जुनासुर्ला* ची कीर्ती पसरे जगी पुन्हा माऊली !!४!!
वैनतटावर वैभवशाली वसली सुर्ला नगरी
इतिहासाची खूण दाखवी प्राचीनत्व मंदिरी
केशवनाथा कृपाप्रसादे दिशा आम्हा दाविली !! ५ !!
रचना:- अरूण झगडकर,
गोंडपिपरी जि.चंद्रपूर
1 टिप्पण्या
खूप खूप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा