लाॅकडाऊनच्या लग्नाची
काय सांगू तुले कहाणी
वीस, पंचविस व-हाडी
आम्ही दोघं राजाराणी
अस वाटे वराड्यायचा
एकमेकासंग 36चा आकडा हाये
सुतक असल्यावाणी
एक फुटावर दुर उभे राये
डीजे नाय बॅन्ड नाय
नाही नाचनं गाणं
लगन असून मयतीवाणी
वाटे मले सुनं सुनं
लोप पावला नागिन डाॅन्स
ना काहीच मौज मस्ती
दारु पिऊन झगड्याची प्रथा
बंद झाली वरातितली कुस्ती
चाय कच्च्या चिवड्यावरच
उरकला प्रीती भोज
लोकाच फुकट खाले तयार
असे आता टोमणे मारते रोज
आत्त्या , मावशी काकी
अहिरासाठी बसल्या तोंड फुगवून
सगे सोयरेधायरे दारुसाठी
बसले कोप-यात रुसून
मेकअप लिपिस्टीक लावून
वरातीत सजून होत्या बाया
कंम्पलसरी व्हता मास्क
नटन थटन फुकट गेल वाया
ईचार केला व्हता मनात
लग्नानंतर हनिमूनले जाईन
नवरा नवरी सकट केलं
समद्या घराले क्वाॅरंनटाईन
कोरोना मयाच लग्नावेळी
देवा कोनता केला मी गुन्हा
वाटत द्यावं सोडचिट्टी ईले
अनं दुसरं लग्न कराव पुन्हा
रवी आत्राम
नांदगाव ( पोडे)*
0 टिप्पण्या