हुरहूर !



हुरहुरही जीवाला वाटून रोज येते
स्वर्गात माय माझी स्वप्नात रोज येते

अंजारते मला ती फिरवून हात पाठी
सोडून का गं गेली प्रश्नात रोज येते

मी सोडले तिला, वाऱ्यावरी असा का
नयनात दाटणाऱ्या अश्रुत रोज येते

ऐश्वर्य जे मिळविले त्यागून प्रेम माया
निर्जीवता तयातील बघण्यास रोज येते

जगण्यास जीवनी ह्या पैसा न येई कामी
जीव लाव तू जीवाशी सांगण्यास रोज येते

सौं आनंदी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या