देशातील अत्याधुनिक बॉटनीकल गार्डनसाठी 8 कोटी 58 लक्ष रु निधी मंजूर व वितरित !

जंगल से जीवन के मंगल तक !
हम से तन को समाधान मिलता है !!
वन से मन को समाधान मिलता है !!

चंद्रपुरातील बल्लारपूर रोडवरील विसापूर येथील बोटॅनिकल गार्डन च्या संबंधात अर्थसंकल्प अधिवेशन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चा  चर्चा घडवून आणून बोटॅनिकल गार्डन साठी निधी मंजूर केला. 
बघा व्हिडिओ....!  

  • आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे यश !



चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजीक साकारण्यात येत असलेल्या बोटॅनिकल गार्डन साठी निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास या राज्य योजनेअंतर्गत 8 कोटी 58 लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महसूल व वन विभागाने दि. 31 मार्च 2022 रोजी या बाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून त्या माध्यमातून सदर 8 कोटी रु निधी वितरित करण्यात आला आहे .

आ. सुधीर मुनंटीवार यांच्या वनमंत्री पदाच्या कार्यकाळात जैवविविधतेच्या संवर्धनाची दुरदृष्‍टी सांगणारा प्रकल्‍प म्‍हणजे बॉटनिकल गार्डन. विदर्भात विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्‍हयातील भौगोलिक क्षेत्र हे उत्‍तम निसर्ग वन आणि जैव विविधतेने संपन्‍न आणि समृध्‍द असे क्षेत्र आहे. या निसर्ग वैभवाला या प्रकल्‍पामुळे नवसंजीवनी मिळणार आहे.

वनमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्‍य शासनाच्‍या १६ जून २०१५ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्‍याचा संकल्‍प आ. मुनगंटीवार यांनी केला. सदर प्रकल्‍पाची योजना राबविण्याकरिता राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍था, लखनऊ या संस्‍थेची या प्रकल्‍पाच्‍या तांत्रीक कामात मोलाची मदत वनविभागाला झाली व होत आहे.

फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्‍याबाबतचे प्रशिक्षण हे या संस्‍थेच्‍या सहभागाचा मुख्‍य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरिअम, बीज, संग्रहालय, बोन्‍साय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलीया, गार्डन इत्‍यादी घटकांचा समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व गरीब लोकांना जगण्‍याण्‍चे साधन निर्माण होणार आहे. तसेच वनविभागामार्फत रोपवन कामे, निरीक्षण पथ, जल व मृद संधारणाची कामे, वॉच टॉवर पूल, रस्‍ते, जलाशय, सुशोभीकरण, सिमेंट नाला बांध, ट्री हाऊस, इतर कामे प्रगतीपथावर आहेत. जागतिक दर्जाचे इन्स्टिटयूट आपल्‍या विभागात उभे राहिल्‍याने त्‍या भागाच्‍या सार्वत्रीक उत्‍कर्षाला सुरूवात झाली आहे. या प्रक्रियेतुन या परिसरात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. बंगळूर येथील बॉटनिकल गार्डन च्या धर्तीवर उभारण्यात येणारे हे बॉटनिकल गार्डन देशभरातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
मध्यंतरी च्या काळात निधीअभावी या प्रकल्पाचे काम रखडले होते .त्यामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करुन या प्रकल्पासाठी निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास या राज्य योजने अंतर्गत 8 कोटी 58 लाख रु निधी मंजूर व वितरित केला आहे.

जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले प्रयत्न व त्या माध्यमातून या प्रकल्पाला मिळालेली गती ही लोकप्रतिनिधीच्या सक्रियतेचे व तत्परतेचे द्योतक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या