माऊजरसहित सराईत गुन्हेगाराला एलसीबी ने घेतले ताब्यात !



  • खुनासाठी वापरणार होता शस्त्र, घटना घडण्यापुर्वी केली आरोपीला अटक!
  • जिल्ह्यात येणाऱ्या माऊझर चा योग्य तपास व्हायला हवं !
  • स्थानिक गुन्हे शाखेची कारवाया प्रशंसेस पात्र !

चंद्रपूर (वि.प्रति.) : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये अपघातांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महत्वाचे म्हणजे माऊझसारख्या हत्यारांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर ही घातक बाब आहे. जिल्ह्यातील येणारे हे माऊजर कुठून येत आहे याचा तपास होणे गरजेचे आहे. अपघातांच्या वाढत्या घटना सोबत सोबतच चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा च्या कारवाया तेवढ्याचं प्रशंसनीय आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज बुधवार दि. 27/04/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगाराजवळ अग्निशस्त्र/माऊझर असल्याची कळले. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून दुर्गापुर हद्दीतील उमेश टेलर्स यांच्या दुकानासमोरून जाणाऱ्या प्रमोद रामलाल सुर्यवंशी (36) व्यक्तीला पकडून त्याच्या त्याला विचारपूस केली असता त्याचे जवळ माऊजर व पाच जिवंत काडतूस आढळले. अधिक विचारपूस केल्यानंतर आरोपी एका व्यक्तीचा खून करण्यासाठी आपणही या शास्त्राच्या वापरण्यात असल्याची कबुली दीली. अटकेत घेतलेल्या आरोपीवर अनेक प्रकारची गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या जवळून 20,000/-रु. किंमतीचे एक देशी बनावटीचा लोखंडी माउजर / अग्नीशस्त्र, 5,000/- रू. किंमतीचे 5 जिवंत काळतुस असा एकुण 25,000/- रु.चा माल पंचासमक्ष जप्त पंचनामा कार्यवाही करून ताब्यात घेतला. सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेव खाडे सपोनी जितेंद्र बोबडे सपोनी संदिप कापडे 4 पोउपनि अतुल कावडे पोहवा / प्रकाश बलकि पोना / अनुप डागे, जमिर पठाण नितेश महात्में, मिलींद चव्हाण पोशि / मयुर येरणे प्रमोद कोटनाके यांचे पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या