देशी दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार पाच हजार पत्रे !



दारू दुकानांविरोधाचे आंदोलन तिव्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाची भुमिका संशयास्पद !

चंद्रपूर : दाताळा रोडवरील जगन्नाथ बाबा मठाजवळील देशी दारु दुकान हटविण्यासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक एकवटले असून दुकान हटविण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधत आहे. दरम्यान शनिवारी दुकान हटविण्याच्या मागणीसाठी पाच हजार पत्र पाठविण्याचा निर्धार करीत नोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

गडचांदूरात न.प च्या संकुलात जि.प व गांधी शाळेजवळ बिअर शॉपीचे आज झाले उद्घाटन !


गडचांदुर शहरांमध्येही नगर परिषदेच्या महात्मा ज्योतिबा फुले संकुल मध्ये जे बिअर शॉपी जवळच जिल्हा परिषद शाळा आणि महात्मा गांधी mcvc ज्युनिअर कॉलेज आहे. त्या ठिकाणी आज 23 रोजी बिअर शॉपीचे उद्घाटन झाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दूकान व बिअर शॉपी वाटप करतांना जिल्ह्यात आंदोलन होतांना आपल्या विभागाच्या भुमिका स्पष्ट करायला हव्या.

दाताळा रोड मार्गावरील जगन्नाथ बाबा मठ परिसरात नव्याने दारु दुकानाला परवानगी देण्यात आली. मात्र या दुकानाला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी जनविकास सेनेतर्फे दुकान बंद करण्यात आले. दुकानाचे स्थलांतरण करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी दुकानासमोरच सत्याग्रह आंदोलन सुरु केले. आंदोलनात महिलांनी सहभागी होत भजन आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. तर शनिवारपासून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना सुमारे पाच हजार पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येणार आहे. जगन्नाथबाबा नगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांकडून पत्रावर स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार पत्रे पाठविण्यात येणार आहेत. दिनांक 23 एप्रिल असून या उपक्रमाला साव ले-आऊट जगन्नाथबाबा नगर येथून सुरुवात करण्यात आली. जनविकास महिला आघाडीच्या रूपा बैरम,
मेघा दखणे, रेखा पोलावार ,शकुंतला रामटेके, राखी रामटेके प्रणाली बैरम, उत्कर्षा साव,अरुणा महातळे, मेघा मगरे ,रमा देशमुख,रंजना कांबळे, पल्लवी दानी शांताबाई पेटकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली, असे एका पत्रकान्वये निलेश पाझारे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या