विवाह सोहळ्यात जादूटोणा, चमत्कार यावर प्रबोधन कार्यक्रम !



ताराचंद रायपूरे यांच्या मुलीच्या लग्नात जनजागृतीपर कार्यक्रम !

चंद्रपूर : आजच्या धावपळीच्या युगामध्ये लग्न किंवा अन्य कार्यक्रम म्हटले की देखाव्याला स्थान देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विवाह कार्यक्रम म्हणजे डी जे च्या आवाजावर थीकरणारे पाय, नाच-गाणे, मस्ती या लागलेल्याचं असतात.
बल्लारपूर शहरातील एक लग्न मात्र जनजागृती अंधश्रद्धा, जादूटोणा यावर उद्बोधन कार्यक्रम घेऊन लग्न समारंभ पार पडला. सध्या या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सू आहे. विवाह कार्यक्रमात प्रबोधन कार्यक्रम हा काही वेगळाच असतो. बल्लारपूर येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे सैनिक ताराचंद रायपूरे यांचा मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्याकरिता वैज्ञानिक दृष्टीकोन चमत्कार प्रात्यक्षिक व जादूटोणा विरोधी कायदा यावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अ.भा. अनिस चे जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी विविध चमत्कार करून त्यामागील कारणे तसेच जादूटोणा विरोधी कायदा यावर आलेल्या पाहुण्यांचे प्रबोधन केले. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते प्रा. राजेश ब्राम्हणे सर, प्रा. विनय कवाडे सर, आयोजक ताराचंद रायपूरे आणि त्यांच्या परिवार आणि पाहुणे उपस्थित होते .संचालन निशिका सातपुते यांनी तर आभार प्रा.राजेश ब्राह्मणे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या