ई-टिव्ही भारत चे पत्रकार अमित वेल्हेकर यांचे लोकजागृती करणारे अभिनंदणिय वृत्त...!



शिक्षीका "निशा दडमल" यांचा उपक्रम प्रेरणादायक !

एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे चंद्रपुरच्या शाळेत येणे बंद झाले. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून निशा दडमल या शिक्षिकेने वसा उचलला आहे. शाळा झाल्यावर 20 किलोमीटर दूर ताडोबाच्या घनदाट जंगलात असलेल्या मामला गावात त्या जातात. बाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत जाण्यासाठी स्वखर्चाने त्यांनी ऑटो लावून दिला आहे. हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख.

ईटीव्ही भारतचा अमित वेल्हेकर यांचा विशेष रिपोर्ट वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंक क्लिक करा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5082886211790494&id=100002074952080&sfnsn=wiwspwa

"आपणास जे माहित आहे, ते इतरांना अवश्य सांगावे" हा मनुष्य स्वभाव असतो. अपेक्षित/अनपेक्षित घटना याची माहिती मिळविणे मग ती जनतेपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचविणे, हे पत्रकारांचे कार्य असते. प्रत्येक पत्रकार आपल्या स्वभाव व गुणधर्मानुसार ते कर्तव्य पार पाडीत असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी भवानजीभाई शाळेच्या शिक्षिका "निशा दडमल" शाळेतील शिक्षणाचे कर्तव्य बजावून ताडोबाच्या जंगलातील मामला या गावातील कोरोनामुळे मुळ शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना २०-२५ कि.मी. अंतरावर जंगलातून दुचाकीने प्रवास करून शिक्षण दान देण्यासाठी दररोज जात असल्याचे ई-टिव्ही भारत चे पत्रकार अमित वेल्हेकर यांचे संक्षिप्त वृत्त व्हिडीओ सहीत वाचण्यात आले.‌ पत्रकार म्हणून प्रसन्नता देणारी ही लोकजागृती, लोकशिक्षण तसेच अनेकांना प्रेरणा देणारी अशीचं ही संक्षिप्त वृत्तमालिका आहे, त्याबद्दल पत्रकार म्हणून अमित वेल्हेकर प्रशंसेस पात्र आहे. दोन‌ दिवसांपुर्वीच शिक्षकी क्षेत्राला काळीमा फासणारी लाजिरवाणी घटना जिवतीमध्ये घडली होती. "जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा, हम हिलके थोडे झुमे तो सबने देखा" असे अनेक वृत्त आजकाल वाचायला मिळतात. वाघाच्या हल्ल्याने एखाद्याचा जिव गेला, त्या घटनास्थळावर जायचे असेल तरी पत्रकारांची दोन-चारांची चमू सोबत जाते. शिक्षणाचे दान देण्यासाठी शिक्षीका निशा दडमल दुचाकीने एकट्या जंगलातून प्रवास करून जातात, ही बाबचं अंगावर काटा आणणारी आहे. स्वत:ला ज्येष्ठ, विद्वान, ब्युरोचिफ असे अनेक नानाविध स्वयंघोषित पदव्या लावून, हातात महागडे मोबाईल ठेवून व स्वतः:चे आकर्षक व्हीजीटींग कार्ड घेऊन मिरविणाऱ्या साधा अवाक्षर ही लिहीता-वाचता न येणाऱ्या पत्रकारांची संख्या सध्या पावसाळ्यात कुकरमत्यांसारख्या उगविणाऱ्या प्रमाणे वाढली आहे. सदर संक्षिप्त वृत्तमालिका अशांना बोध घेण्यासारखी व पत्रकारितेची पत वाढविणारी नक्कीच आहे. क्षा अमित वेल्हेकर यांची व माझी कधी प्रत्यक्ष भेट किंवा बातचित ही झालेली नाही. वृत्तातील वास्तव व आवडलेले संकलन यामुळे हा लेखनप्रपंच ! ही पांचटगिरी किंवा चमचेगिरी आहे असे जर एखाद्याने गृहीत धरले तर तो त्यांचा नतद्रष्टेपणा असु शकतो, मला त्याचा काही फरक पडणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या