जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ!



राजकीय वरदहस्तापुढे प्रशासन हतबल?

जमनजेट्टी परिसरात रेती उत्खननाला पून्हा सूरूवात !

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला तहसिलदारांची केराची टोपली !

चंद्रपूर (वि.प्रति.)
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अवैध व्यवसाय ऊत आला आहे. रेती तस्करी, कोळसा तस्करी, बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूची तस्करी मोठी साखळी या ठिकाणी उभी झाली आहे. कायद्याच्या कोणतीचं भिती या तस्करांना नसल्याचे दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्करी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नदीनाले ओरबाडून त्या ठिकाणाहून रेतीची तस्करी केल्या गेली आहे प्रशासनाने थातूरमातूर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल केले परंतु रेती तस्करी आळा बसविण्यात कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. या तस्करांवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रशासन हतबल असल्याचे खाजगीरीत्या प्रशासकीय अधिकारी सांगत असतात. यापूर्वी चंद्रपूरचे माजी खासदार नरेगा पुगलिया यांनी महावीर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जिल्ह्यातील अबे दिवस आहे मागे राजकीय वरदहस्त असल्याचे चे पत्र लिहून तर त्याची चौकशी करण्याची ची मागणी केली होती.

रेती तस्करी करणारे तर इतके मस्तावले आहेत की, अधिकार्‍यांवर हमले करण्यापासून त्यांना धमकावणे पर्यंतचे कारण ते करीत आहे. 28 फेब्रुवारी रोजी इरई नदी काठावरील जमनजट्टी परिसरात रेती तस्करांच्या गाडीवर काम करणारा मारुती गेडाम नावाचा एक मजूर रेतीच्या ढिगाऱ्याखाली खाली दबून मृत पावला. मजुराच्या मृत पावल्यानंतर रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले व येनकेन प्रकारे हे प्रकरण दडपण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या परिसरात रेतिचे उत्खनन इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे की या नदीच्या काठावर संपूर्णपणे मोठमोठे खड्डे पडले आहेत. तरीसुद्धा या ठिकाणाहून पोकलेन आणि जेसीबी च्या साह्याने रेतीचे ओरबडणे सुरुच आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना इरई नदी सौंदर्यीकरणाच्या पूर्वी जमनजेट्टी परिसरात ज्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन झाले आहेत त्या परिसराची प्रत्यक्ष मोजणी करून त्यामध्ये दोषी असलेल्या रेती तस्करांकडून दंड करण्यात यावा अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय खनिकर्म विभाग जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर यांनी तीस मार्च 2022 रोजी सदर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करून दोषी रेती तस्करावर दंडात्मक कारवाई करण्याबाबतच्या आदेश चंद्रपूर चे तहसीलदार यांना दिला आहे. यासंदर्भात अद्यापही चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी कोणतीच कारवाई केल्याचे निदर्शनास येत नाही. एका अर्थी जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राला चंद्रपूरच्या तहसीलदारांनी केराची टोपली दाखविली आहे.

रेतीचे अवैध उत्खनन यामुळे प्रदूषण व पर्यावरण संस्था मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात अव्वल आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्या ही लढावे लागते. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या रेती तस्करीच्या या गंभीर प्रकरणाला जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गांभीर्याने घेऊन प्रशासनाला तसे आदेश द्यावे अशी अपेक्षा चंद्रपूर जिल्ह्याची जनता त्यांच्यावर बाळगून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या