गाव अजुनई जागा
जावू हलक्या पावली,
पाहातील कोनीतरी
सांज आतासीन झाली....
चुकवत चुकवत
आजूबाजूच्या नंजरा,
जावू लुकत लुकत
पावू सपनाच्या घरा.....
भितीवर तुजी माजी
तसबीर पावू पुना,
कानाकोपऱ्यात खोजू
तुज्या माज्या खानाखुना....
चल, हिंडू घरभर
बसू झुल्यात बांदल्या,
सांगू मजेत दोगंई
गुजगोस्टी मनातल्या.....
चल, झुंजुरका झाली
पाहातील कोनीतरी,
तुज्या माज्या सपनाच्या
पुनावून येवू घरी......
मुरलीधर.ई.खोटेले.
0 टिप्पण्या