आदर्श गांधीजींचा !



नेते मजेत आहे जनता सजेत आहे
आपआपली दुकाने ती थाटून आहे

महागाईच्या नावे रोज बोंबाबोंब यांची
महागाईच्या वस्तू हेच वापरत आहे

कर्तव्यशुन्य माणसे सत्तेवर बसलेली
बापजाद्याच्या पुण्याईने फळे खात आहे

स्वप्नात ही पहाते सत्तासुंदरी पळाली
सत्तासुंदरी ही यांना सोडून जात आहे

गर्जनाच फुसक्या बाबरी पाडल्याच्या
भोंगे उतरविण्यासाठी फाटत कां
आहे

दारूचे बार मिळण्यास चढाओढ यांची
पिण्यास पाणी नाही काळजी कुणास आहे

प्राणी अन् माणसांचा संघर्ष कां असावा
जंगलात माणसांचा हस्तक्षेप फार आहे

कुठे गेले गांधीजी अन् कुठे आहे
आदर्श
आदर्श गांधीजींचा या बगळांनीच
मोडला आहे

- रमेश कृष्णराव भोयर भद्रावती
   ्

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या