कोरोना च्या पहिल्या गंभीर लाटेत ज्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले त्या पैकी ज्ञात अश्या काहींना आपण कोरोना योद्धा म्हणुन गौरविले. पुढे त्यांचे काय? याबद्दल आपण कधी विचार केला नाही. परंतु समाजात अश्या काही व्यक्ती आहेत ज्यांनी गवगवा न करता सेवा दिली आणि सेवा हाच त्यांचा पिंड पण आहे. राजकुमार गिमेकर हे त्यापैकीच एक!
अत्यंत उच्च विद्या विभूषित राजकुमार जी यांनी स्वतःला पर्यावरण, शिक्षण-प्रशिक्षण आणि प्रबोधन कार्यात झोकून दिले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी दशेमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव आयुष्यावर पडला. पुढे नाशिक मध्ये शिकत असताना निवृत्त डीसीपी डॉ. संजय अप्रांती ,डॉ किशोर मानकर यांच्या प्रेरणेने कार्य प्रशस्त होत गेले. ते कार्य अव्याहत सुरू असले तरी त्यांना आता वाढवायचे आहे.
राजकुमार गिमेकर हे प्राध्यापक, रेल्वे अश्या विभागात नौकरी सोडून लोकांची प्रत्यक्ष सेवा करता यावी म्हणुन चंद्रपूर च्या वीज केंद्रात दाखल झाले.
कोरोना योद्धा म्हणून संस्मरणीय कार्य !
महानिर्मिति मधे ट्रेनिंग मधे मित्र एकत्र येवून गरीब विद्यार्थी ची मदत ,व सामाजिक कार्य भरीव असे करावे, या विचाराने ते काम करू लागले. दरम्यान कोरोना चे वादळ आले. वीज केंद्र कॉलनी व विज केंद्र मध्ये साधारण १0000 हजार लोक राहतात. त्यांचा कोरोना पासून बचाव,test ,Quarntine ,Vaccination,Sanitization,Survey करिता PHC दुर्गापुर ला,डॉ संगीता बोधलकर याना मदत करने,लसिकरन अधिकारी ,दंड अधिकारी असे विविध काम आणि वीज केंद्र अखंडित वीज उत्पादन करीत राहील असा मध्यम मार्ग या सूत्रावर तत्कालीन मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या मार्गदर्शनात राजकुमार गिमेकर यांनी कोरोना अधिकारी म्हणुन योध्दा चमू चे नेतृत्व केले. स्वतः हृदयरोगाने ग्रस्त असूनही ज्या पद्धतीने राजकुमार गिमेकर यांनी कर्तव्य बजावले त्याचा गौरव जिल्हाधिकारी यांनी तर केलाच पण खासदार धानोरकर आणि ऊर्जा राज्य मंत्री तनपुरे ,आमदार जोरगेवार,माजी अर्थमंत्री मुंनगटीवार जी यांची सुद्धा कौतुक थाप व मुख्य अभियंता CSTPS ,श्री पंकज सपाटे साहेब यानी ही त्यांच्या कोरोना टीम च सत्कार केला व प्रेरित केले, एकीकडे कोरोना शी लढा तर त्याच वेळी बेरोजगार गरीब मजूर, इतर कामगार ,lockdown मधे लोकांची चुल पेटावि म्हणून राशन किट वितरण , शेल्टर कैम्प मधे मजूराना भाजी भाकर डब्बा पोहचवने तसेच ऊर्जा फाउंडेशन तर्फे लोकांना अन्नधान्य, कोरोना सुरक्षा साधने अश्या गरजा पुरविता पुरविता एका अतिरिक्त्त कार्यकारी अभियंता CSTPS चे रूपांतर साध्या सेवा कार्यकर्त्या मध्ये कधी झाले ते त्यांनाही कळले नाही, इतकी समरसता क्वचित पाहातो.
याचाच प्रभाव कौटुंबिक जीवनावर झाला. घरी वेळच देत नाहीत. जीवाची पर्वा करत नाहीत म्हणुन पत्नी आणि आप्तेष्ट नाराज झाले. अशी नौकरी कशाला करता? असे सल्ले पण मिळाले. आणि नाराजीचे टोक काडीमोड होता होता राहिले.
विक्रमी रक्तदानाचे दुत !
राजकुमार गिमेकर यांना रक्तदानाचा दुत म्हटले पाहिजे. २००९ पासून ते या कार्यात आहेत. वीज केंद्रात दरवर्षी सुमारे 1000 ते 1500 बॉटल रक्त संकलन विविध कार्यकमातून, करून जिल्ह्यातील सिकलसेल व थेलसमिया व अपघात रुग्ण जीव वाचव या करिता देण्यासाठी मौलिक असा समन्वय इतर संस्था सोबत राजकुमार जी यांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांच्या कडून रक्ताची गरज, रोग्यांची स्थिती आणि रक्तदानाची चळवळ समजून घेताना मागील दोन वर्षात तब्बल 2500 च्या बॉटल रक्तदानाचा समंवय करण्यात गिमेकर यांचे योगदान राज्य स्तरावर सत्कारासाठी नोंदले गेले.
शहाणे करून सोडावे सकळ जन !
शीक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे बाबासाहेब म्हणाले. त्याचा गूढ तितकाच दूरगामी अर्थ लक्षात घेऊन राजकुमार यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवले आहेत. गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य, गणवेश,पुस्तके, एवढेच नव्हे तर ग्रामीण मुलींना सायकल सुद्धा दिली जाते. गरीब परंतु हुशार मूल मुलींना दत्तक घेऊन शिक्षण पूर्ण करण्यास सहकार्य ऊर्जा सामाजिक मंच च्या माध्यमातून सत्यताने केले. स्वत: स्पर्धापरिक्षा करिता विद्यर्थिना कोचिंग दिली व कित्येक आज नौकरीवर विविध पदावर आहेत, तर व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन गेल्या १२ वर्षापासून सुरूच आहे.
अनेकांना उभे करणारे काम !
ऊर्जा फाउंडेशन चंद्रपुर नावाची कर्ती संस्था बनवून,तसेच सदभावना एकता मंच व डॉ आंबेडकर सोशल क्लब , APEC सोबत जुडुन आहेत , अनेकांना सन्मानाने जगण्याची आणि सक्षम होऊन सेवा देण्याची ऊर्जा देण्याचे काम गेल्या १२ वर्षापासून करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शाळा महावि्यालयांमध्ये विविध सेमिनार व मार्गदर्शन करण्यास ततपर आहे. स्पर्धा परीक्षेचे दरवर्षी होणारे जिल्ह्यातिल कार्यशाला अनेकांचे आयुष्य उभे करणारे ठरले आहेत. नुसत्या पुस्तकी आणि कागदी शिक्षणाने समाजाचे भले होणार नाही, त्यासाठी सुसंस्कृत समाज उभा राहिला पाहिजे म्हणुन स्वतः एक आंतर राष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्याचा निर्णय राजकुमार गिमेकर व त्यांचा टीम यांनी घेतला आहे. आपल्याला मिळकतीचा एक छोटा भाग समाजाला देणे आणि नुसते देऊन न थांबता त्याचे प्रत्यक्ष परिणामांत रूपांतर करणे हे खरे सेवा कार्य आहे. याचकाला रोज समिधा देण्यापेक्षा तो याचकच सक्षम करणे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मिती चे कार्य आहे. हे कार्य राजकुमार गिमेकर नेटाने करत आहेत.
2 टिप्पण्या
🤣🤣🤣 very funny
उत्तर द्याहटवा🙏💐💐💐👍👌👍🤝🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवा