गडचांदूर मधील "त्या" देशी दारू दुकानाची पत्रकार संघाने केली संबंधितांकडे केली तक्रार !



दूकानाचे मोजमाप व सादर केलेल्या कागदपत्रांची होणार वरिष्ठ स्तरावर योग्य ती चौकशी करून‌ कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत !

दूकानासमोरील मारझोड प्रकरणाची ही गृहमंत्र्यासहीत पोलिस अधिक्षकांकडे तक्रार ! चौकशी करून गुन्हा करण्याचे संघाला दिले आश्वासन !

चंद्रपूर ((वि.प्रती.) : गडचांदूर शहरातील वादाच्या भोवऱ्यात राहणारे जि. यू. शेंद्रे (ला. नं. 16/2021-22) यांच्या देशी दारू दुकानाच्या मंजुरीसाठी, 2015 मधील मंजूर जागा व सद्यस्थिती असलेल्या बांधकामाची संपूर्ण चौकशी करून तत्कालीन गडचांदूर ग्रामपंचायत मंजुरी दिलेल्या या देशी दारू दुकानाच्या वास्तविक बांधकामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी तसेच अत्यंत वर्दळीच्या जागेत असलेल्या शेंद्रे यांच्या देशी दारू दुकानामुळे नागरिकांना होत असलेला मानसिक त्रास व आतापावेतो या देशी दारू दुकानाचे आलेल्या तक्रारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी पत्रकार संघाने सोमवार दिनांक 9 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, मुंबई, चंद्रपूरचे माननीय अधीक्षक, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी साहेब, तसेच अधिक्षक, नगर विकास विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना एका निवेदनाद्वारे तक्रार अर्ज केला असून प्रत्यक्ष भेटी दरम्यान सदर देशी दारू दुकानाच्या पूर्ण कागदपत्रांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळात देण्यात आले.





तसेच शुक्रवार दिनांक 6 मे रोजी दारू दुकानासमोर ग्राहकाला भररस्त्यावर हात-पाय बांधून करण्यात आलेली अमानुष मारहाण यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनासुद्धा छायाचित्रासह तक्रार अर्ज केला करण्यात आला असून सदर दोन्ही प्रकरणावर लवकरच चौकशी करून गुन्हा दाखल होणार असल्याचे कळते.

"सबकुछ लेन-देन से चलता है!" काही फरक पडत‌ नसल्याच्या "तोऱ्यात" दारूविक्रेते!

ग्राहकाला रस्त्यावर अमानुषपणे मारझोड करणे, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने दारूची विक्री करणे याबाबत चुकीचे काहीच नाही असे समजणारे दारूविक्रेते "सबकुछ लेन-देन से चलता है!" काही फरक पडत‌ नसल्याच्या "तोऱ्यात" दारूविक्रेते असल्याचे दिसत आहेत. मुख्य म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने दारूची विक्री करणे हा दंडात्मक गुन्हा आहे. तसेच बिअर शॉप किंवा ज्शॉपमधून एम.आर.पी. पेक्षा जास्त दराने दारूची कमी करणे हा सूद्धा दंडात्मक गुन्हा आहे. तक्रारीनंतर यावर कायदेशिर कारवाई करण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. तसेच

 देशी दारू दुकान किंवा अन्य दुःख दारू दुकानातून फक्त ग्राहकांना पिण्यासाठी दारू चा पुरवठा करणे भाग आहे परंतु परवानाधारक दारु विक्रेत्यांकडून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना खुलेआमपणे दारू दुकानातून दारूची विक्री होतांना दिसत आहे. यावरही चंद्रपूर जिल्ह्यात कारवाई होताना दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार जादा दराने दारू विक्रीतून महिन्याकाठी लाखो ची कमाई करणारे दारू विक्रेते आपल्या याच कमाई मधून संबंधित विभागाला "पोसत" असल्याची भाषा करतात. गडचांदूर मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर व पत्रकार संघाने दिलेल्या तक्रारीनंतर अनेक सामाजिक संघटना व मानवाधिकार संघटना आता या संदर्भात शासन दरबारी आवाज उचलणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाचे म्हणजे 35 हजारच्या आसपास लोकसंख्या असलेले गडचांदूर शहरात १२ वाईन बार, ४ देशी दारू दुकान व ५ बिअर शॉपी असल्याचे कळते. आणखी काही व्यवसायिकांनी देशी दारू दुकान व बिअर शॉपी साठी अर्ज केले असून त्यासाठी काही राजकारण्यांना "मॅनेज" करण्याचा प्रकार गडचांदूर मध्ये सूरू असल्याचे कळते. तसेच राजकीय पक्षाचे "गाव तिथे शाखा" असे धोरण असते त्याप्रमाणे दारू विक्रेत्यांनी आता "जिथे घर, तिथे दारुचे दूकान" असे धोरण गडचांदूर शहरात अवलंबिल्या जात असल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या