चंद्रपूर जिल्ह्यातील आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त पौर्णिमा मेहरकुरे यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सामाजिक कार्यात दमदार योगदान देत पर्यावरण संवर्धनासाठी सेवाभावी वृत्तीने स्वतःला वाहून घेतले आहे . आजवरी चंद्रपूर तालुका पुरोगामी महिला मंचाच्या अध्यक्ष असलेल्या पौर्णिमा मेहरकुरे यांनी विविध उपक्रमातून समाजात पर्यावरण चळवळीची आवड निर्माण केली. त्यांच्याशी अनेक कार्यकर्ते जुळून पर्यावरण संवर्धनाची गरज लोकमानसात रुजविण्यात त्या यशस्वी ठरल्या . नुकत्याच जिल्हा पुरोगामी महिला मंचाच्या सरचिटणीस म्हणून नियुक्त पौर्णिमा मेहरकुरे यांच्यातील पर्यावरणप्रेम व लोकजागृतीचा व्यासंग आणि निस्वार्थ कर्तृत्व लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे कार्यकारिणीत त्यांची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विविध पुरस्काराने विभूषित पौर्णिमा मेहरकुरे यांची सहसचिवपदी निवड झाल्याचे पत्र देऊन पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरिकर यांनी सन्मानित केले . या निवडीबद्दल पौर्णिमा मेहरकुरे यांचे मित्रवर्ग व समाजबांधवांकडून कौतुक तसेच अभिनंदन करण्यात आले .
0 टिप्पण्या