ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे निधन !


चंद्रपूर : आयुष्याची 40 वर्षे चंद्रपुरात निर्भीड पत्रकारिता करणारे व त्यापूर्वी अनेक मोठ्या वर्तमानपत्रातून आपली छाप उमटविणारे चंद्रपुरात साप्ताहिक "चंद्रपूर पत्रिका" या वर्तमानपत्रातून आपल्या धारदार लेखणीने दरारा निर्माण करणारे सुरेश बाळकृष्ण धोपटे यांचे आज २५ मे रोजी वयाच्या 77 व्या वर्षी दुपारी 12 वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. वडसा देसाईगंज येथील मथुरा बलात्कार कांड, मथुरा यांचे पती आरोपी असलेले दोन शिपाई यांची प्रत्यक्ष भेट, प्रगती गाईंची लिखित निवेदने न्यायालयाची निवडे यावर आधारित सचित्र स्टोरीत देशात सर्वप्रथम आनंद बाजार पत्रिका प्रकाशन कलकत्ता येथील प्रथम रविवार आणि स्व. जनार्दन ठाकुर संपादक असलेल्या संडे मिड-डे मध्ये प्रकाशित केली. अशा अनेक शोध पत्रकारिता सुरेश धोपटे यांच्या नावे आहेत.
दि हितवाद, फ्री प्रेस जर्नल, नवशक्ती, नागपूर टाईम्स, नया उर्दू समाचार, जनवाद, सामना या दैनिकांने समाचार भारती, वृत्तसंस्था आणि साप्ताहिक ब्लिट्झ, करंट, श्री, रणांगण, न्युज ट्रॅक इत्यादी साठी चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. पाच दशकांपेक्षा अधिक काळ वृत्तपत्रसृष्टीत कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश बाळकृष्णराव धोपटे यांनी आपल्या पत्रकारितेचे पस्तीस वर्षाच्या जवळपास काळ त्यांनी चंद्रपूरात काढला. असून निर्भिड व निर्भिड, निष्पक्ष लेखनामुळे त्यांचा चंद्रपूरात दरारा होता. आज दुपारी 12 वाजता दरम्यान हिंदनगर स्थित राहत्या घरी निधन झाले. पत्रकार प्रवीण धोपटे यांचे ते वडील होत. वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि मुंबई येथे त्यांनी पत्रकारिता केली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली मेघा व निशा, मुलगा प्रविण, जावई, स्नुषा. नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीचे वादळ शमले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या