चंद्रपूर (प्रति.)
विविध महापुरूषांच्या विशेष कार्यामुळे प्रेरणा मिळावी यासाठी विविध महानुभवांच्या नावाने विशेष दिन साजरे केले जातात. डॉ. सर्वमपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रेरीत कार्याने शिक्षक दिन, भारतरत्न डॉ. विश्वैश्वरैय्या यांच्यापासुन प्रेरणा मिळावी म्हणुन अभियंता दिन (इंजिनिअर्स डे) असे अनेक दिवस भारतामध्ये व जागतिक स्तरावर साजरे केले जातात. महानुभवांच्या कार्याने प्रेरित होऊन त्या-त्या क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या हातुन ही एखादे आठवणीतील कार्य घडावे यासाठी हे दिवस साजरे केले जातात. परंतु या महानुभवांच्या कार्याचीच आता त्या-त्या क्षेत्रातील विसर पडल्याचे दिसते. शिक्षक दिन संपूर्ण भारतामध्ये मोठ्या स्तरावर साजरा होतांना दिसतो. परंतु शिक्षणदानाचे कार्य प्रामाणिकपणे पार पडावे, आपले कर्तव्य पार पाडणारे फार कमी आढळतात. तीच स्थिती अभियंता दिनाची आहे, भारतरत्न डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या महान कार्याची आठवण करून देणारा हा दिवस अनेक कार्यालयामध्ये फक्त औपचारिकता म्हणुन पाळला जातो. डॉक्टर दिनाची अवस्था ही त्यापेक्षा वाईट आहे. हा दिवस कुठे साजरा होतांना दिसत नाही. कोरोना काळामध्ये ईश्वराची भुमिका वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरी पेशा अनके बऱ्या-वाईट कारणाने ओळखले गेले. डॉ बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे यासाठी १ जुलै ला संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर दिन पाळला जातो. परंतु अनेक डॉक्टरांना याबद्दल माहिती नाही. याचे आश्चर्य वाटते. कुठे हा दिन पाळल्या गेल्याचे ऐकविण्यात येत नाही. आम्ही दुसऱ्यापेक्षा कसे श्रेष्ठ असे दाखविण्याची जणू या क्षेत्रामध्ये स्पर्धा लागली आहे. जास्तीत जास्त धन गोळा करण्याचे स्त्रोत म्हणुन अनेक जण आज समोर येत आहे, हे दुर्भाग्य आहे.
डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन स्थापित केला. राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मन की बात या कार्यक्रमात डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर्स दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, १ जुलै रोजी आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू ज्या डॉक्टरांनी कोविड -१९ ने उद्भवलेल्या आव्हानापुढे भारताला हार मानू दिली नाही, त्या डॉक्टरांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.
डॉक्टर दिन हा केवळ भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्येही साजरा केला जातो. जगातील विविध देशांकडून डॉक्टरांचा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त भारतात दरवषी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूणाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले, अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टर दिन साजरा करण्यासंदर्भातील निर्णय घेतला. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डॉ. रॉय यांचा जन्म १८८२ मध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालावधील भारताच्या पटणा बंगाल प्रेसीडेंसी येथे झाला. गणितातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठात औषधांसंदर्भातील शिक्षण घेतले. पुढील औषधांसंदर्भातील उच्च शिक्षणाच्या महत्वाकांक्षेने ते परदेशात गेले. लंडनमधील प्रतिष्ठित सेंट बाथीलोमेझ हॉस्पिटलमध्ये त्यांना अभ्यास करायचा होता. परंतु ते आशियाई खंडातील असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीसुद्धा त्यांनी हार न मानता सतत ३० दिवस प्रयत्न केल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला.
भारताबाहेरचा डॉक्टर दिन! डॉक्टर दिन हा केवळ भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्येही साजरा केला जातो. अमेरिकेत हा दिवस ३० मार्च रोजी, क्यूबामध्ये ३ डिसेंबर रोजी तर इराणमध्ये २३ ऑगस्ट रोजी डॉक्टर दिन साजरा केला जातो. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात मार्च १९३३ मध्ये प्रथमच डॉक्टर दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस डॉक्टरांना कार्ड पाठवून आणि निधन झालेल्या डॉक्टरांच्या कबरीवर फुले ठेवून साजरा करण्यात आला होता.
0 टिप्पण्या