गडचांदूर शहरातील आदिवासी जमिनीच्या विक्री घोळ प्रकरणाची चौकशी करा!



आदिवासी विकास मंत्री नाम. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करणार मागणी !

चंद्रपूर (वि.प्रति.)
नुकतेच आमदार बच्चू कडू जिवती येथे आल्यानंतर त्यांनी आदिवासींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची घोषणा केली त्यानंतर गडचिरोलीचे आमदार डॉक्टर होळी यांनी आदिवासींवर अन्याय संदर्भात विधानसभेत प्रश्‍न उचलणार असण्याची नुकतीच घोषणा केली.

महत्त्वाचे म्हणजे राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक आदिवासींना अत्यल्प रकमेचा लालच दाखवून त्यांच्या जमिनी करोडो रूपयात खरेदी करून आल्या व त्यानंतर त्याचा एन.ए. न करता त्या जमिनीवर प्लॅट पाडून १००/- रू. च्या स्टॅम्प पेपर गैरकानूनीरित्या आदिवासी बांधवांना धोक्यात ठेवून करोडो रुपये कमविण्यात आले. खोटी कागदपत्रे बनविण्यात आली. सदर प्रकरणाचा त्यानंतर तक्रारीही झाल्या आजच्या स्थितीमध्ये गडचांदूर मध्ये अनेक ठिकाणी लेआउट मधील लोकं घर बांधून राहत असून त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नसल्यामूळे त्यासंबंधात न.प. मध्ये मागणी केल्यानंतर अशा कोणत्याही घरांची आपल्यापाशी नोंद नसल्यामूळे हे ले-आऊट पाडल्या गेल्यामुळे गोरगरिबांवर अन्याय झाला आहे. त्यासंदर्भात अनेकांनी वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या असून आदिवासी विभागाचे अप्पर सचिव यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून नुकतेच अभ्यासू व विद्वान आदिवासी विकास मंत्री नाम. प्राजक्त तनपूरे यांच्याकडे या तक्रारी पाठविण्यात आल्या असून त्यावर झालेली कारवाई या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात नामदार तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्ह्यात दौरा असून त्या वेळेस एक शिष्टमंडळ तनपुरे यांना भेटून सदर प्रकरणात दोषी असणाऱ्या वर व सदर प्रकरणात मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात पूराव्यानिशी मागणी करणार आहे. यात काही राजकीय नेत्यांच्या समावेश असल्यामुळे सदर प्रकरण अभ्यासू व विद्वान आदिवासी नेते नामदार तनपूरे गांभीर्याने घेतील असे म्हटले जात आहे. योग्य चौकशी झाल्यास व या प्रकरणात अनेकांना हातकड्या ही लागू शकतात व ते जेलची वारी खाण्याची चिन्हे दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या