डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दुःखद निधन!



नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास !

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर श्री. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्‍जवे या रूग्‍णालयात त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतल

सच्चिदानंद मुनगंटीवार यांचा  ्चा्च  एक अनूभव !

संस्कार कुटुंबातूनच मिळतात


30 जुलै 2018 सुधीर भाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त साप्ताहिक विदर्भ आठवडी नेहमीप्रमाणे विशेषांक प्रकाशित केला होता आपल्या प्रत्येक विशेष अंकाचे कोणाच्या तरी हाताने प्रकाशन करीत असतो. डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या हाताने सदर अंक प्रकाशित करावा असा सल्ला सुरेश धोपटे यांनी दिला व जैन भवण समोरील सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या रुग्णालयामध्ये भीत भीत मी प्रवेश केला्. मी डॉक्टर साहेबांना याबद्दल पुर्वी माहिती दिली नव्हती. सर्वसामान्य दवाखान्याप्रमाणे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या दवाखान्यात डॉक्टरसाहेब येण्यापूर्वी सर्वसाधारण कुंटुबातील रुग्ण बसले होते. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी दवाखान्यात प्रवेश केला, सर्वप्रथम रूग्णांना तपासले. सर्वसाधारण कुटुंबात व डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यात येणारे रुग्ण डॉक्टर साहेबांची बोलण्याची पद्धत यावरून कुठेच जाणिव झाली नाही की हे सुधीर मुनगंटीवार यांचे ते वडील आहेत. साधी रहाणी उच्च विचार, घमंडाचा लवलेश ही नसलेले व्यक्तिमत्व बघायला मिळाले. रुग्ण तपासल्यानंतर रुग्ण संतुष्ट झाल्यावर डॉक्टर साहेबांनी मला येण्याचे कारण विचारले तेव्हा मी त्यांना सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त विशेषांक काढला आहे आणि त्याचे प्रकाशन करायचे अस सांगितले. डॉक्टर साहेबांनी विशेषांक बघितला आणि या अंकाचे प्रकाशन केले. आणि तो क्षण आज हि स्मरणात आहे. अंकाचे प्रकाशन करतांना संस्कार हे कुटूंबातूनचं मिळत असतात, अशी डॉक्टर साहेबांना बघून माझी धारणा पूर्ण विश्वासात बदलली आज त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून वाईट वाटले परंतु मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. सर्वसामान्यांनी हे मानायलाच हवे. या दु:खद समयी मुनगंटीवार कुटुंबावर कोसळलेल्या संकटावर मात करण्याची शक्ती मुनगंटीवार कुटुंबांना मिळो तसेच सुधीर भाऊंना त्याच जोमाने कार्य करण्याची शक्ती प्राप्त होईल ईश्वरा पाशी मागणी आहे. एक आठवण म्हणून हा न विसरणारा प्रसंग ! ्प्प्प्प्प


डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्‍युसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदा-या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍त परिवार आहे.

त्‍यांचे पार्थीव शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायं. ४.३० वा. त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या