मनसेचे दमदार, लढाऊ नेतृत्व राजू कुकडे !




शोषित, पिडीत, अन्यायाग्रस्त जनतेच्या लढ्यात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचा सक्रिय सहभाग !


जन्मदिन विशेष !

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे राज्यातील अनेक लोक आपल्याला न्याय मिळावा म्हणून शिवातीर्थावर जातात आणि त्यांना न्याय पण मिळतो याच कारणाने महाराष्ट्रात आणि बाहेर ही राजसाहेब नावाचे वलय आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे. मनसे ची जिल्ह्यात स्वतः:ची वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी धडपड करणारे एक व्यक्तीमत्त म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे ! जिल्ह्यातील कित्तेक लोक आपल्या हक्क अधिकारासाठी त्यांच्याकडे हक्काने जातात, मनसे चा हा मनसैनिक न डगमगता, न घाबरता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. व त्यांना लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणारे व्यक्तीमत्व राजू कुकडे हे आहेत, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील लोकांना माहित आहे. त्यांच्या वर्षातून कित्तेक पत्रकार परिषदा प्रेस क्लब मध्ये होतात त्यात वेगवेगळे विषय असतें, मग एखादा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असो, शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न असो, एखाद्या महिला किंव्हा मुलीवर झालेला अत्याचार असो की जनतेची शासन प्रशासन किंव्हा एखाद्या संस्था व कंपनीकडून झालेली फसवणूक असो मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे समर्थपने हे विषय घेऊन शासन प्रशासनाविरोधात लढतात व शोषित पीडिताना न्याय मिळवून देतात त्यामुळे मुंबईत राजसाहेब तर चंद्रपूर जिल्ह्यात राजू कुकडे जनतेचा आवाज बनला असल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आहेत त्यापैकी राजू कुकडे यांचे पक्ष उभारणीचे काम हे वाख्यान्यांजोगे आहेत. त्यांनी वरोरा भद्रावती विधानासभा क्षेत्रात पक्षाला अशी उभारणी दिली की त्या क्षेत्रात गावागावात मनसेच्या शाखा निर्माण होत आहे व त्यामुळे संघटन बांधणी जोरदार सुरु असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मनसेला निर्णायक यश मिळू शकते व पक्षाचा आमदार निवडून येऊ शकतो.

राजू कुकडे यांनी कुठले प्रश्न सोडवले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उत्कृष्ट सूत्रसंचालक, प्रभावी वक्ता व संघटक म्हणून राजू कुकडे यांच्याकड़े बघितल्या जाते, पक्षाच्या बैठका सभा यामध्ये आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महाराष्ट्र सैनिकांत ऊर्जा निर्माण करण्याचे कसब असलेल्या राजू कुकडे यांनी आजवर जिल्ह्यातील अनेक विषय हाताळले व त्यात यश सुद्धा मिळाले, त्यात महत्वपूर्ण विषय होता तो जीवती पहाडावर आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न, ज्यात पटवारी आणि मंडळ अधिकारी यांनी चुकीचे व बोगस पट्टे तयार करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली होती त्यात राजू कुकडे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तर पटवारी व मंडळ अधिकारी यांचे निलंबणं करण्यात आले, राजुरा येथे एका खाजगी शाळेत लैंगिक शोषणाचा विषय समोर आल्याने राजू कुकडे यांनी त्यात पुढाकार घेऊन संस्थापकांवर गुन्हे दाखल करायला लावून त्या मुलींना न्याय मिळवून दिला. वरोरा तालुक्यात मुस्लिम मायलेकीवर एका नराधमांने बलात्कार करून त्यांना गंभीर जखमी केलेल्या प्रकरणात राजू कुकडे यांनी पुढाकार घेत त्यांना न्याय मिळवून दिला एवढेच नव्हे तर भद्रावती तालुक्यात एका शेतकऱ्याची जमीन दारूच्या नशेत सावकाराने बनावट रजिस्ट्री करून हडप केली ती शेतकऱ्यांना मिळवून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील एसीसी सिमेंट कंपनीचा "नॉट फॉर रिसेल" सिमेंट बैगा चोरी प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यास शासनाला भाग पाडले तर चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त कलाकाम कंपनीच्या गुंतवणूकदरांचा प्रश्न पोलीस प्रशासनाकडे लावून धरून कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. चंद्रपूर जिल्हा परिषदेत निविदा घोटाळा व साहित्य खरेदी घोटाळा समोर आणून दोन कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असे अनेक उदाहरणे देता येतील ज्या राजू कुकडे यांनी एखाद्या परिपक्व नेत्यासारखी विषय हाती घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव जनतेच्या ओठी आणण्याचे काम केले.

वरोरा तालुक्यात त्यांच्या नेतृत्वात पक्षाला मिळणार बळकटी!

मागील विधानसभा निवडणुकीत मनसे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने राजू कुकडे यांनी मनसेचे उमेदवार यशस्वी उदयोजक रमेश राजूरकर यांच्या प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळून प्रतिस्पर्धी उमेदवार यांना घाम फोडला होता व विदर्भात पहिल्यांदाच मनसेच्या उमेदवाराला 35 हजारापेक्षा जास्त मते मिळवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेचाच आमदार होईल अशी पक्ष बांधणी सुरु केली. त्यासाठी प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा फलकाचे उदघाटन जोरात सुरु असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला निश्चितच यश मिळेल अशी अपेक्षा आहे.

सामाजिक जीवनात कार्य करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, मनस्ताप व नाहक गैरसमज निर्माण होतात, त्यातून योग्य मार्ग काढीत लढा देणारे नेहमी यशस्वी होतात व ते यश दिर्घकाळ टिकणारे असते. राजू कुकडे यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात भरघोस यश प्राप्त होवो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मनापासून मनसेमय शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या