सा.बां. विभाग क्र. २ चा कार्यकारी अभियंता म्हणुन इंजि. मुकेश टांगले यांनी सांभाळला पदभार !
चंद्रपूर (का.प्रति.) : सा.बां. मंडळ, चंद्रपूर येथील अधिक्षक अभियंता सुषमा बोंद्रे यांचे नागपुर येथे स्थानांतरण झाल्याने तसेच अनंत भास्करवार, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग क्र. २ चंद्रपूर हे नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ मुल रोड स्थित वन अकादमी येथे ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी सा.बां. मंडळ चंद्रपूर येथे अधिक्षक अभियंता म्हणुन नव्याने रूजु झालेले अरूण गाडेगोणे तसेच विशेष अतिथी म्हणुन सा.बां. विभाग क्र. १, चंद्रपूर चे कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, कार्यकारी अभियंता वर्धा बुब, कार्य. अभियंता नगराळे आर्वी तसेच सा.बां. विभाग क्र. २ चंद्रपूर नव्याने रूजू झालेले कार्यकारी अभियंता मुकेश टांगले इत्यादी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. #S.B. Sushma Bondre, Superintending Engineer of Mandal, Chandrapur has been transferred to Nagpur and Anant Bhaskarwar, Executive Engineer, S.B. Section No. 2 Chandrapur, who retired as per the rules of age, was felicitated on November 30 at the Forest Academy, Mull Road. On this occasion, Mr. Arun Gadegone, newly appointed as Superintending Engineer at Mandal Chandrapur and as a special guest Mr. Section No. 1, Chandrapur Executive Engineer Sunil Kumbhe, Executive Engineer Wardha Bub, Works. Engineer Nagarle Arvi and S.B. Section No. 2 Chandrapur newly joined Executive Engineer Mukesh Tangle etc. dignitaries were present on this occasion.
चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सा.बां. विभाग क्र. १ व सा.बां. विभाग क्र. २ असे दोन विभाग येतात. मागील काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य उल्लेखनिय राहिलेले आहे. अनेक नाविण्यपुर्ण व देखण्या वास्तु जिल्ह्यात उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे सा.बां. विभाग चंद्रपूर जिल्हा अव्वल स्थानी येतो.
बुधवार दि. ३० नोव्हेंबर रोजी अधीक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, सा.बां श. मंडळ, चंद्रपूर व नवनियुक्त कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग क्र. २, चंद्रपूर यांचे स्वागत व अभि. सुषमा बोंद्रे यांना बदलीमुळे निरोप व सा.बां. विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार व उपकार्यकारी अभियंता महेंद्र धमागाये हे सेवानिवृत्तीमुळे निरोप समारंभ वन अकादमी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री. मनोज जुनोनकर, अभि. महिमा डोंगरे, अभि. कांचन उघडे, अभि. दिप्ती पचारे यांनी सुंदर संचालन केले. तसेच अभि. संजय राठोड, हेमराज थाटकर, अतुल साखरकर, अभि. स्वप्निल राठोड, अभि. मुत्यालवार, अभि. मनोज जुनोनकर, कंत्राटदार श्री. जयंत मामिडवार, अभि.प्रकाश बुब, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, वर्धा, अभि. सुनिल कुभे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग क्र.१, चंद्रपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निरोपाला श्रीमती सुषमा बोंद्रे, अधिक्षक अभियंता, यांनी उत्तर देतांना आपला आजपर्यंतचा प्रवास, कार्यशैली व अभियंत्यांने कसे आदर्शवत व गुणवत्तापूर्ण काम करावे या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. महीला सुध्दा फार उत्कृष्ट काम करु शकतात, त्यांना जबाबदारी द्या असे आवाहन केले..
या प्रसंगी अभि. अनंत भास्करवार यांनी निरोपाला उत्तर देतांना त्याचा शासकीय सेवेतील आजपर्यंतचा प्रवास, मिळालेल्या संधीचे कसे सोने केले, नक्षलग्रस्त भागात केलेले उल्लेखनीय कार्य व १०० घरकुलाचे काम त्या काळी वरीष्ठांच्या मार्गदर्शनात कसे वर्षभरात कसे पुर्ण केले, विविध वास्तु, रस्ते व पुलांची निर्मिती जरी शासकीय निधीतून होत असली तरीसुद्धा चांगल्या गुणवत्तेच्या कामाची जनमानसात चर्चा होऊन त्याला मुर्तरूप मिळाल्यानंतर त्या विभागाचे किंवा संबंधित अभियंत्यांचे कौतुक केल्या जाते. शासकीय निधीमधुन होणाऱ्या या निर्मीती चांगल्यात चांगल्या व टिकाऊ व देखण्या कश्या राहतील, यासाठी अभियंत्यांनी विशेष परिश्रम घ्यावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी श्री. महेन्द्र धमगाये, उपकार्यकारी अभियंता यांनी सुद्धा निरोपाला उत्तर दिले.
या प्रसंगी नव्याने रुजू झालेले श्री. अरुण गाडेगोणे, अधीक्षक अभियंता यांनी या त्यांच्या आधीचे प्रकल्प ज्या गुणवत्तेने पुर्ण करण्यात आलीत व जी अपुर्ण कामे आहेत आहेत ती कामे सगळ्या क्षेत्रीय अधिकारी यांचे सहकार्याने त्याच जोमाने व गुणवत्तापूर्वक पुर्ण करण्यात येईल अशी ग्वाही तात्कालिक अधीक्षक अभियंता श्रीमती सुषमा बोंद्रे तसेच उपस्थित सगळ्या अधिकारी, कर्मचारी यांना दिली. या मंडळात माझ्या चमूत अत्यंत हुशार व मेहनती, वक्तृत्वाची जात असलेले अभियंते आहेत त्यांच्या सहकाऱ्यांने येणार्या काळात जोमाने विकास कामे मार्गी लावून पुर्ण करण्यात येईल अशी आश्वासक ग्वाही प्रांजळपणे दिली..
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. संजोग मेंढे, सं.अ. १, श्री. प्रशांत वसुले, उपविभागीय अभियंता, श्री. राजेश चव्हाण, उपविभागीय अभियंता, श्री. नितीन मुत्यालवार, उपविभागीय अभियंता, श्री. प्रकाश अमरशेट्टीवार, उपविभागीय अभियंता, अभि. संजय राठोड, अभि. स्वप्निल राठोड, अभि. मल्लिकार्जुन जावळे, अभि. डिंपल नायर, अभि. श्री. श्रीकांत डाहुले, अभि.मनोज झाडे व सर्व अधिकारी, कर्मचारी सा.बां. मंडळ, चंद्रपूर, सर्व कंत्राटदार बंधू, अभि. भुषण येरगुडे, उपविभागीय अभियंता (विद्युत) यांनी अथक परीश्रम घेतले.
सा.बां. विभाग क्र. २ चा कार्यकारी अभियंता म्हणुन इंजि. मुकेश टांगले यांनी सांभाळला पदभार !
गुरूवार दि. १ डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंता म्हणून अभि. श्री. मुकेश टांगले यांनी पदभार सांभाळला. अभि. मुकेश टांगले हे यापुर्वी पोंभूर्णा सा.बां. उपविभागात उपविभागीय अभियंता म्हणुन कार्यरत होते. पोंभूर्णा येथे अनेक नाविण्यपुर्ण आकर्षक वास्तुंची निर्मीती करण्यात आली आहे. पोंभूर्णा येथील 'व्हाईट हाऊस' प्रतिरूप म्हणुन साकारण्यात आलेली पंचायत भवन ची वास्तु देशात चर्चिल्या गेली हे विशेष !
पुर्व कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार यांनी ११.०७.२०१९ रोजी सा.बां. विभाग क्र. २ चा पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात अनेक नाविण्यपुर्ण वास्तुंचा मुर्तरूप मिळाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदावर पदोन्नतीवर आलेले अभि. श्री. मुकेश टांगले यांची नियुक्ती करण्यात आली. १ डिसेंबर २०२२ रोजी अभि. अनंत भास्करवार यांनी मुकेश टांगले यांना पदभार देऊन त्यांना खुर्चीवर स्थानापन्न केले. या प्रसंगी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.
0 टिप्पण्या