साहित्य संमेलनातील चर्चासत्रातील प्रमुख पाहुणे व तज्ज्ञांचा सूर ! The tone of the main guests and experts in the discussion session of the Sahitya Samelan!
चंद्रपूर (का. प्रति.)
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ संघाचे स्व. मनोहरराव म्हैसाळकर स्मृती प्रित्यर्थ प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात १६ तारखेपासुन चंद्रपूरात सुरू असलेल्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवशाच्या तेराव्या सत्रात पाचव्या चर्चासत्रात 'चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव, पाणी आणि पर्यावरण' या सत्राचे अध्यक्ष लोकसत्ता चे निवासी संपादक देंवेंद्र गावंडे होते तर या चर्चासत्रात बंडू धोत्रे, संजय वैद्य, डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी सहभाग घेतला.
यावेळी वन्यजीव व मानवसंघर्ष यावर प्रकाश टाकतांना वाघांची वाढलेली संख्या, त्यावर नव्याने करावयाच्या उपाययोजना वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ, वाघांची वाढती संख्या यावर बंडू धोत्रे यांनी आकडेवारीसह प्रकाश टाकला. तर गोंडकालिन, ब्रिटीशकालीन पाणी पुरवठा, पाणी वितरण संस्था यांची आजच्या अमृत योजनेपर्यंतची स्थिती यावर बोलतांना पाणी वाचविणे कसे गरजेचे आहे, ते न झाल्यास पाण्यासाठी लातुर सारखी भयावह परिस्थितीचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागू शकतो. आपल्या रोजच्या वापरामध्ये पाणी आपण कसे वाचवू शकतो यावर उदाहरणासह जलदुत संजय वैद्य यांनी आपले विचार व्यक्त केले. तर चंद्रपूरात उद्योगापासुन होणारे प्रदुषण, प्रदुषणापासुन उद्भवलेले आजार, त्यावर होत असलेल्या कागदोपत्री उपाययोजना व चंद्रपूरात वास्तव्य करणे कसे धोखादायक आहेत, यावर आकडेवारी सह डॉ. योगेश दुधपचारे यांनी या चर्चासत्रात आकडेवारी सादर करीत यासाठी चंद्रपूरातील प्रत्येक नागरिकानी समोर येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. On this occasion, Bandu Dhotre shed light on the increasing number of tigers, increasing number of tigers, increasing number of tigers, new measures to be taken on this while highlighting the issue of wildlife and human conflict. So while talking about the status of Gondkalin, British water supply, water distribution organization till today's Amrut Yojana, how it is necessary to save water, if not, the Chandrapurkars may have to face a dire situation like Latur for water. Jaladut Sanjay Vaidya expressed his thoughts on how we can save water in our daily use with examples. So with the statistics, Dr. Yogesh Dudhapchare presented the statistics in this seminar and asserted that every citizen of Chandrapur needs to come forward for this.
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील जंगल आणि त्याचे फायदे त्याचे तोटे दिसून येत आहे. वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष हा नवा नाही. तो हा फार पूर्वीी काळापासून सुरूझालेला आहे. १९९० च्या काळामध्ये ताडोबा मध्ये फार वाघ कमी होते. गडचिरोली एकही वाघ नव्हते. आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ हल्ले होऊ लागले आहे.
वाढत्या लोकसंख्येनुसार मानवाच्या गरजा भागवण्यासाठी शासन रस्ते, वीज, आरोग्य सुविधा करत असते. मात्र वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येनुसार त्यांच्या गरजा भागवण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाहीत. वन्यजीव संघर्षाचा स्थानिक पातळीवरील संघर्ष हा साहित्यातून उमटायला हवा. या संघर्षीची फळे भविष्यात मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील. वाढत्या वाघांच्या संख्येमुळे आणि भीतीमुळे पाथरी परिसरातील कोळसा बंद पडला आहे. तेंदूपांनाचे तोडणी जर कमी झाली तर वाघाचे हल्ले कमी होऊ शकतात. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना आखल्या पाहिजे, असे प्रतिपादन चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव, पाणी आणि पर्यावरण या चर्चासत्राचे अध्यक्ष लोकसत्ता चे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप देशमुख यांनी केले. Forest in Chandrapur Gadchiroli district and its advantages and disadvantages are seen. Human-wildlife conflict is not new. It started from a long time ago. During the 1990s, there were very few tigers in Tadoba. There was no tiger in Gadchiroli. Today, a large number of tiger attacks have started in Gadchiroli district.
According to the increasing population, the government is making roads, electricity, health facilities to meet the needs of the people. However, as the number of wild animals increases, measures are not being taken to meet their needs. Local level conflict of wildlife conflict should emerge from the literature. The fruits of this struggle will have to be borne in the future. Coal mining in the Pathri area has been shut down due to increasing numbers of tigers and fear. If the felling of tigers is reduced, tiger attacks can be reduced. Loksatta resident editor Devendra Gawande, chairing a seminar on wildlife, water and environment in Chandrapur-Gadchiroli district, asserted that a long-term solution should be planned to avoid human-wildlife conflict.
0 टिप्पण्या