आठ पैकी दोन ट्रक चंद्रपूर-उमरेड व चार ट्रक वणी येथील !
परिवहन विभाग आणि पोलिसही करतात याकडे दुर्लक्ष, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने झाली कारवाई!
चंद्रपूर (वि. प्रति. )
वणी तालुक्यातील मुकूटबन मार्गावरील पेटूर गावाजवळ पोलिसांनी कोळशाची तस्करी करणारे आठ ट्रक पकडले. १०० ते १५० कोटी रूपयांची कोळशाची तस्करी करण्यात आल्याची खळबळजनक बाब यामुळे उघड झाली आहे. या कोळसा तस्करी मध्ये वापरण्यात येणारे ट्रकची फिटनेस प्रमाणपत्र नसणे, विमा न भरणे, कराचा भरणा केला नसतांना ही याबाबतीत परिवहन विभाग आणि पोलिस कानाडोळा करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यवतमाळ च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे सदर प्रकरण उघडकीस आले असुन हा कोळश्याचा हा गोरखधंदा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एका ट्रकमध्ये ३० टन कोळसा वाहतुक करण्याची परवानगी असतांना त्यावर ३८ ते ४० टन कोळश्याची ओव्हरलोड वाहतुक होत होती. संबंधित विभागाचे मात्र याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध कोळसा व्यापारी करोडोची माया जमवित असुन शासनाचा महसुल याठिकाणी मोठ्या प्रमाणात डुबविल्या जात आहे. ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई मात्र नगण्य प्रमाणात होत असते, विश्वसनीय सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून, ट्रान्सपोर्ट धारकांकडून प्रत्येक जड वाहनामागे तिन ते साडे तिन हजारांचे "अतिरिक्त लोड" प्रादेशिक परिवहन विभाग व त्यांचे एजेंटांना महिण्याकाठी मिळत असल्यामुळे ओव्हरलोड जड वाहनांवर कारवाई करण्यास परिवहन विभागातील अधिकारी कुचराई करित असल्याचे वास्तव आहे.
“कोळश्याचा "झोल...!” आणि सब “गोल गोल... !”
https://www.vidarbhaathawadi.in/2022/12/coal-depots-running-in-name-of.html
प्रदूषित चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनांची कागदपत्रे तपासणी साठी राबवावी विशेष मोहीम !
Collectors should conduct a special campaign to check the documents of heavy vehicles in the polluted Chandrapur district!
चंद्रपूर जिल्ह्यातही शेकडोंच्या संख्येत जड वाहने असलेल्या अनेक ट्रान्सपोर्टधारकांकडे फिटनेस प्रमाणपत्र नाहीत, विमा न भरणे तसेच कराचा भरणा न केलेले अनेक ट्रक आज रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य कमी होत असुन या गंभीर बाबींकडे संबंधित विभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. नुकताच मोठ्या स्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला. सुरक्षा सप्ताहानिमीत्त तरी किती वाहनांचे विमा, फिटनेस प्रमाणपत्र, विविध करांचा भरणा झाला की नाही ? याची चौकशी करण्यात आल्यास अनेक ट्रान्सपोर्टधारकांचे बिंग उघड होऊ शकते, असे मत सुज्ञ नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्हा हा अति प्रदुषित जिल्हा आहे. नुकतेच केंद्रीय पर्यावरण समितीने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३३५ दिवस प्रदुषित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढलेल्या प्रदुषणावर गांभीर्याने लक्ष देवून जड वाहनांच्या तपासणी ची विशेष मोहिम चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांनी राबवावी, असे ही मत या निमीत्ताने व्यक्त केल्या जात आहे.
0 टिप्पण्या