"त्या" चोरीतील आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक! # The accused in "that" theft was arrested by the police along with the material!



चोरीमध्ये मध्यप्रदेशातील टोळीचा समावेश !

चंद्रपूर : दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी भाजप पदाधिकारी सुरज पेदुलवार, यांच्या लहान बहीनीचे लग्न नागपुर रोडवरील शकुंतला लॉन, चंद्रपुर येथे होते. लग्नाच्या दरम्यान रात्री वधु ची मोठी आई सौ. संतोषी पेदुलवार यांच्या हातात नववधुचे दागीने १३ लाख ६४ हजार रू. किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लग्न मंडपातून पळविली होती. सदरची माहीती पोस्टे रामनगर ला मिळताच पोलीसांनी तात्काळ धाव घेवून चोरीचा गुन्हा दाखल करून तपासास घेतला गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्हयाच्या तपास कामी विविध पथके तयार करण्यात आली. ज्यात प्रामुख्याने स्थानीक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलीस स्टेशन यांच्या पथकाचा समावेश होता.

ही चोरी विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने इतर तीन ते चार आरोपींनी केली अणि सदर आरोपी हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील असुन एका दुर्गम भागातील आहे. सहा. पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे आणि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला. यातील विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवुन गुन्हयात चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागीने किंमती ९,२१,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच प्रमाणे आरोपीनी गुन्हयात वापरलेले चार चाकी वाहन कि. ८,००,०००/- रू. जप्त करून आणण्यात आले. इतर आरोपी फरार असुन शोध चालु आहे. सदर गुन्हयात एकुण १७,२१,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. नि. राजेश मुळे पोलीस स्टेशन, रामनगर हे करीत आहेत.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधीर नंदनवार, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोस्टे रामनगर, पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर, सपोनि हर्षल अकरे, सपोनि जितेंद्र बोबडे, पोहवा प्रशांत शेंदरे, नापोशि किशोर वैरागडे, नापोशि पुरुषोत्तम चिकाटे, नापोशि लालु यादव, नापोशि संतोष येलपलुवार, नापोशि छगन जांभुळे, नापोशि प्रशांत लारोकर, पोशि गोपाल आतकुलवार, पोशि. कुंदनसिंग बाबरी, पोशि नितीन रायपुरे, पोशि रविंद्र पंधरे, पोशि विकास जाधव यांनी तपास कामात मोलाची भुमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या