सहाय्यक जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने प्रशासकीय भवन परिसरात स्वच्छता मोहीम ! Officers and employees gave the message of cleanliness through labor donation!

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून दिला  स्वच्छतेचा संदेश !

चंद्रपूर (का. प्र. ): आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तसेच आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविन्यात आली. Also, with the aim of making our office and office area clean and beautiful, under the leadership of Collector Vinay Gowda, a cleanliness campaign was initially implemented in the area of the Collectorate. तर आता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर प्रशासकीय भवन परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.

युवा अधिकाऱ्यांची प्रशंसनीय कामगिरी !

चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परदेशी साहेब, शहरचे उपविभागीय अधिकारी मुरुगनाथ एम., जि. प. चे उपकार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे कार्य हे प्रशंसनीय आहे. अल्पावधीत या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यातून वेगळी छाप निर्माण केली आहे.  त्यांच्या या कार्यातून त्यांच्या अधिनस्त अधिकारी- कर्मचारी वर्गणी प्रेरणा घेऊन शासकीय कामे गतिमान करण्यासाठी योगदान दिल्यास चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रात "मॉडेल" म्हणून अवश्य ओळखला जाईल. तसेच जिल्ह्यातील सामाजिक  स्वास्थ्याला घातक असलेल्या तस्करावर आळा बसविण्यासाठी कायदेशीर मार्गाने हितसंबंथ बाजूला सारून आपली कर्तव्ये पार पाळतील,  तसेच "सरकारी काम, बारा महिने थांब" हि म्हण जिल्ह्यासाठी बनलेली नाही असे कार्य या अधिकाऱ्यांच्या हातून घडावे. अशी भोळी अपेक्षा येथील जनता या अधिकारी कर्मचाऱ्याकडून बाळगून आहे.  

सरकारी काम आणि बारा महिने थांब !. !.....!! 

प्रशासकीय भवन येथे विविध कार्यालय आहेत. या कार्यालयात दैनंदिन शासकीय कामकाजाच्या निमित्ताने नागरिकांची व अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. तसेच इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या श्रमदानात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक प्रमोद घाडगे यांच्यासह प्रशासकीय भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या