कलकत्ता : कलकत्ता लिटरेचर कर्णीवल येथे यंदाचा ऑथर ऑफ दि इयर हा बहू प्रतिष्ठित पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळाल्याने मराठी मानाचा तुरा रोवल्याने साहित्य वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
इंडियन पब्लिशर्स फेडरेशन च्या वतीने दर वर्षी कलकत्ता येथे पुरस्कार देण्यात येतो. बहुभाषिक कथा, कादंबरी या स्पर्धेत सहभागी होत असतात.आशियातील विविध बुक पब्लिशर्स ची येथे रेलचेल असते. पवन भगत यांच्या लाकडाऊन च्या काळातील स्थानांतरित,विस्थापित मजुरांच्या दाहकतेची गोष्ट सांगणारी कादंबरी " ते पन्नास दिवस.. नुकतीच प्रकाशित झाली. पाहता पाहता या कादंबरी ची चर्चा सर्वदूर पोहचली.अनेक समीक्षकांनी,या कादंबरी वर भरभरून लिहिले. अमेझॉन वर वाचकांनी या कादंबरी ला चांगला प्रतिसाद दिला.अनेक भाषेत या कादंबरी चे अनुवाद सुरू झाले. लेखक पवन भगत यांनी ही कादंबरी जनतेची असल्याने त्यावर आपला हक्क नाही असे सांगून कुठलेही मानधन ने घेता सर्वांनाच मुक्त अधिकार बहाल केले. या कादंबरी चा कुठलाही भाग कुणीही सरळपणे प्रकाशित करू शकतो. असे सांगून त्यावरील आपला हक्क नसल्याचे स्पष्ट केले. दुःखावर यातना वर मी कसा हक्क सांगू ? तमाम शोषितांची बाजू ठेवणार्यांनी मुक्तपणे याचा वापर करावा.दुःखाचे,उपासाचे,आजारपणाचे, बहिष्कृताचे कॉपीराईट कसे होऊ शकते.हे तर शोषितांचे हत्यार आहे. असल्या विधानामुळे साहित्य विश्वात आश्चर्याची चर्चा सुरू होऊन एक नवीन पायंडा पवन भगत यांनी निर्माण केल्याचे बोलल्या जात आहे..
पुरस्कार मिळाल्या नंतर प्रेस ट्रस्ट शी बोलताना पवन भगत यांनी मी खुश कसा राहू शकतो.पुरस्काराचा कसला आनंद?जोपर्यंत जगात दुःख आहे. तोपर्यंत कुठल्याही विचारवंताने खुश राहू नये.अस्वस्थ असायला पाहिजे. विचारवंत, कलावंत, कवी,पत्रकार ,साहित्यिक अस्वस्थ असेल.तेव्हाच नवनिर्माण होईल. नवं साहित्य अस्तित्वात येईल. सदर पुरस्कार हा टाळेबंदीच्या काळात उपाशी पोटी रेल्वे च्या रुळावर मृत्यू मुखी पडलेल्या, हायवेवर जीव सोडलेल्या ज्ञात अज्ञात पायदळ चालणाऱ्या मजूरांना समर्पित केले आहे.
0 टिप्पण्या